आता धावणार नॉन-एसी वंदे भारत ट्रेन

    दिनांक :18-Aug-2023
Total Views |
- स्वस्तात आरामदायी प्रवास करणे शक्य
- ऑक्टोबरचा मुहूर्त
 
नवी दिल्ली, 
संपूर्ण वातानुकूलित वंदे भारत एक्सप्रेस विविध राज्यांमध्ये सुरू झाल्यानंतर रेल्वेने आता सर्वसामान्यांनाही या गाडीतून प्रवास करता यावा, यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने येत्या ऑक्टोबरपासून Non-AC Vande Bharat trains नॉन-एसी वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.
 
 
Non-AC Vande Bharat trains
 
याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली. यामुळे अगदी स्वस्तात आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. या वर्षात दोन Non-AC Vande Bharat trains नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांचा विचार करून रेल्वेने वंदे भारत नव्या स्वरूपात आणण्याची योजना आखली आहे. आरामदायी आणि अगदी वाजवी दरात सामान्यांना प्रवास करता यावा, यासाठी ही नॉन-एसी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍याने सांगितले.
 
 
रचनेत बदल, सुविधा त्याच
आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा Non-AC Vande Bharat trains नॉन-एसी वंदे गाड्यांची बाह्य रचना थोडी वेगळी असणार आहे. तथापि, आरामदायी प्रवासात कोणतीही तडजोड होणार नाही. या गाडीतही अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधाही असणार आहे. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत.

एसी गाड्यांपेक्षा वेग कमी
एसी वंदे भारतपेक्षा Non-AC Vande Bharat trains नॉन-एसी गाड्यांचा वेग थोडा कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारतचा वेग ताशी 160 किमी इतका आहे. यावर रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी गाड्यांपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.