चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी अंबा-एकविराला साकडे
भाजपातर्फे मंदिरात महाआरती
दिनांक :23-Aug-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Ekvira@amravati चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय जनता पार्टीतर्फे अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा व एकविरेला साकडे घालत आज सकाळी 11 वाजता महाआरती करण्यात आली. राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे, सहचारिणी डॉ.वसुधा बोंडे यांनी या महाआरतीला उपस्थित होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संपूर्ण शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग होऊ देण्याची प्रार्थना केली.
आज सायंकाळी इस्त्रोने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार चंद्रयान तीनच चंद्रावर लँडिंग होणार आहे. देशासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाचा क्षण असलेला हा प्रसंग यशस्वी व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संस्थांच्या कोषाध्यक्ष मीनाताई पाठक, भारतीय जनता पक्षाचे नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रदेश प्रवक्त शिवराय कुलकर्णी, रविराज देशमुख, राजेश वानखडे, बाळासाहेब वानखडे, रवींद्र खांडेकर, मोहन जाजोदिया, श्रीराम नेहर, मनीष कोरपे, सत्यजित राठोड, प्रणित सोनी, राहुल जाधव, चंद्रकांत भोमरेे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी मंदिरात महाआरती केली.