ऐतिहासिक मोहिमेचे अभूतपूर्व यश !

23 Aug 2023 19:37:07
अग्रलेख

Chandryaan3-India संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरकडून सकारात्मक संदेश आला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ हे यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. आजच्या या मोहिमेमुळे चंद्रावर यान पाठविणाऱ्या देशांमध्ये भारत चौथा ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत रशिया) आणि चीनने चंद्रावर यान पाठविण्याची कामगिरी यशस्वी केली आहे. Chandryaan3-India या अभूतपूर्व कामगिरीमुळे चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे अपयश भारताने धुवून काढले. इस्रोचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ आणि कर्मचा-यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल चांद्रयान मोहिमेच्या संपूर्ण चमूला जोहान्सबर्ग येथून शुभेच्छा दिल्या. Chandryaan3-India ज्याप्रमाणे इस्रोच्या मुख्यालयात बसून सर्व शास्त्रज्ञ या मोहिमेच्या यशस्वितेकडे डोळा लावून बसले होते, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण देशवासीयांनी या मोहिमेचा अखेरचा टप्पा आपल्या डोळ्यात साठवून घेतला. रशियाची चांद्र मोहीम चारच दिवसांपूर्वी अपयशी ठरल्यानंतर भारताच्या मोहिमेकडेही साशंक नजरेने बघितले जात होते. Chandryaan3-India पण भारताने या सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम देत अवकाश संशोधनात मोठी झेप घेत अवकाशालाच गवसणी घातली आहे.

 
 
Chandryaan3-India
 
 
जगात तंत्रज्ञानदृष्ट्या बलवान असलेले इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया आदी देशांना जे साध्य करता आले नाही, ते सहजसाध्य करून भारताने त्या देशांना तोंडात बोटे घालायलाही भाग पाडले आहे. आजच्या या ऐतिहासिक कामगिरीची जगभरातील कोटी-कोटी जनतेला प्रतीक्षा लागली होती. Chandryaan3-India ही कामगिरी यशस्वी व्हावी म्हणून कालपासूनच जगभरात देवाचा धावा केला जात होता. भारतामध्ये तर अक्षरशः उत्साहाचे आणि आनंदाचे भरते आले होते. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारांमध्ये ही मोहीम फत्ते व्हावी म्हणून देवाची आळवणी चालली होती, यज्ञ केले जात होते आणि महाआरत्याही केल्या जात होत्या. अखेर देवाने भक्तांच्या या आळवणीची नोंद घेतली आणि त्यांच्या पदरात चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वितेचा कृपाप्रसाद टाकला. मोहिमेच्या यशामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. Chandryaan3-India अनेक विज्ञान संस्थांनी या निमित्ताने विज्ञानप्रेमींसाठी मोठे स्क्रीन उपलब्ध करून, त्यावर अंतिम लॅण्डिंगच्या क्षणांचा आबालवृद्धांसह आनंद घेतला. अनेक शहरात चांद्रयान-३ चे टी शर्ट घालून युवकांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या. गुलाल उधळला गेला, फुले उधळली गेली आणि मिठाईही वाटली गेली.
'
 
राजकीय पक्षही आनंद साजरा करण्यात आघाडीवर होते. सर्वांनी पक्षाभिनिवेश बाजूला भारत देशाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. ठिकठिकाणी या निमित्ताने इस्रोच्या अभूतपूर्व यशावर चर्चासत्रे झडली. माध्यमांनी या निमित्ताने विज्ञानमार्गी होत अभ्यासकांच्या मुलाखती घेऊन या मोहिमेच्या यशाची गाथा गायिली. या मोहिमेच्या यशात महिला शक्तीने मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य ठरावे. Chandryaan3-India महिलांची घरकामात तर मास्टरी होतीच; पण या मोहिमेच्या यशानंतर महिलाशक्ती काय करामत करू शकते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या  महिला शास्त्रज्ञांनी यानाच्या उड्डाणापूर्वी तिरुपतीच्या बालाजीला घातलेले साकडेदेखील फलद्रूप ठरले आहे. तिरुपतीच्या बालाजीने त्यांच्या पदरात चंदामामाच्या यशस्वी सफारीची भेट टाकली आहे. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरिता चांद्रयान-३ ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. Chandryaan3-India भारतासाठी तर आपले स्वदेशी तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आणि किफायतशीर आहे, हे दाखवण्याचीच ही संधी होती. चांद्रयान-३ मिशनचे एकूण बजेट ६१५ कोटींचे असून ते बजेट इतर देशांपेक्षा खूप कमी असल्याचे मानले जाते.
 
 
चंद्राभोवती असलेल्या वातावरणाची माहिती गोळा करणे, हे चांद्रयान-२ मोहिमेचे उद्दिष्ट होते. चांद्रयान-२ कडून भारताला प्रचंड आशा होत्या. पण हे यान चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग करण्यापूर्वीच क्रॅश झाले आणि भारतीयांची स्वप्ने धुळीस मिळाली. त्यावेळी या मोहिमेचे नेतृत्व करणारे इस्रोचे तत्कालीन प्रमुख डॉ. के. सिवान पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून हमसून हमसून रडल्याचे चित्र देशवासीयांनी बघितले होते. Chandryaan3-India पण त्या अपयशातून खचून न जाता इस्रोने आमच्या तत्कालीन प्रमुखांचे अश्रू वाया गेले नाही, हेच सिद्ध करून दाखविले. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅण्डिंग करणारे चांद्रयान-३ तेथील वातावरणाचा व दगड-मातीचा अभ्यास करणार आहे. चांद्रयानवरील रोव्हर या उपग्रहावरील माती, धुळीच्या नमुन्यांची चाचणी करेल. रेडिओ अ‍ॅनॉटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह आयनॉस्फिअर अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्पिअर (रंभा) आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ सेसमिक अ‍ॅक्टिव्हिटी (इल्सा) ही उपकरणे यानासोबत पाठविण्यात आली आहेत. Chandryaan3-India रंभाद्वारे चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल तर इल्साद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करण्यात येईल. रोव्हर चंद्राचे काही फोटोदेखील काढेल.
 
 
चंद्राचे थर्मोफिजिकल गुणधर्म, पृष्ठभागावरील प्लास्मा वातावरण आणि लॅण्डिंग ठिकाणाच्या आजूबाजूची मूलभूत संरचना अभ्यासण्यासाठी यानासोबत वैज्ञानिक उपकरणेही पाठविण्यात आली आहेत. चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहेत. लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून त्या ठिकाणी १४ दिवस प्रयोग करतील. Chandryaan3-India प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेमध्ये राहील व पृथ्वीवरून येत असलेल्या रेडिएशनबद्दलचा अभ्यास करणार आहे. या चांद्रयान-३ मोहिमेमार्फत इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात याबद्दलची माहिती मिळविणार आहे. श्रीहरिकोटा येथून १४ जुलैला प्रक्षेपण झाल्यापासून चांद्रयान-३ ने गेल्या ४० दिवसांमध्ये प्रत्येक टप्प्यावर आपले काम चोख बजावले. चंद्राभोवती १०० किलोमीटरच्या कक्षेत येईपर्यंत मार्गात कोणतीही दुरुस्ती करावी न लागल्यामुळे प्रोपल्शन मॉड्युलमध्येही अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्युल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल. Chandryaan3-India चांद्रयान-३ मिशनमुळे चंद्रावर सॉफ्ट लँडींग होण्याची आणि त्या ठिकाणी रोव्हर चालण्याची क्षमता आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे भारतातील व्यवसायांमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल. चंद्राचे ध्रुवीय प्रदेश हे दुसऱ्या प्रदेशांपेक्षा वेगळे आहेत.
 
 
त्या ठिकाणी काही असे भाग आहेत की, तेथे सूर्यप्रकाश कधीही पोहोचू शकत नाही आणि तेथील तापमान २०० अंश सेल्सिअस इतके खाली येते. त्यामुळे त्या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात पाणी असू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. चंद्रावर १४ दिवस अंधार आणि १४ दिवस प्रकाश असतो. Chandryaan3-India त्यामुळे ज्यावेळी तेथे रात्र असते त्यावेळी तापमान १०० अंश सेल्सियस इतके खाली येते. चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर हे त्यांच्या सोलर पॅनलमधून ऊर्जा तयार करतील आणि ते १४ दिवस वीज तयार करतील. परंतु वीज तयार होण्याची प्रक्रिया रात्री होणार नाही. वीज तयार न झाल्यामुळे लँडर आणि रोव्हरमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू या तेथील थंडीमुळे खराब होतील, म्हणून चांद्रयान-३ मिशन १४ दिवसांसाठी आहे. चांद्रयान-३ चंद्रावर उतरविण्याच्या प्रक्रियेत १७ मिनिटे गुंतागुंतीची असतील, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले होते. ही प्रक्रिया स्वयंचलित होती. चंद्राला स्पर्श करण्यापूर्वी कोणते अडथळे आहेत, कुठे उंच-सखल भाग आहेत, याची योग्यरीत्या चाचपणी करून यानाने यशस्वी लॅण्डिंग केले आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. Chandryaan3-India या यशाबद्दल इस्रोचे, भारत सरकारचे आणि या साऱ्या मोहिमेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Powered By Sangraha 9.0