तिरंगा फडकवत भारत विद्यालयात चंद्रयान 3 चा जल्लोष

    दिनांक :24-Aug-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Bharat Vidyalaya चंद्रयान- 3 चंद्रावर यशस्वी उतरल्यानंतर आज स्थानिक भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी तिरंगा घेऊन चंद्रयान 3 चा जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरिष भट्टड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभळकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख किशोर चवरे आदी उपस्थित होते.
 
 
Bharat Vidyalaya
 
याप्रसंगी किशोर चवरे म्हणाले की, चंद्रयान 3 मोहिमेकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष लागले होते. चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. Bharat Vidyalaya आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही. यामोहिमेकरिता 615 कोटी रुपये खर्च आला तरी तो आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा कमी आहे. चंद्रयान-3 चे लँडर दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद, एक मीटर 116 सेमी उंच आणि 1749 किलो वजनाचे होते. चंद्रयान-3 च्या लँडिंग स्थळावर होणार्‍या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती करण्यासाठी हा महत्त्वाचा शोध असेल, असे ते म्हणाले.