- प्रा. डॉ. विश्वनाथ कराड
सोलापूर,
माईंर्सं एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष Dr. Vishwanath Karad प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईंर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली 40 वर्षे मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरुण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. अशा या समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाची सुरुवात येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेनुसार करण्यात येत आहे.
Dr. Vishwanath Karad : या एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कायदा, व्यवस्थापन, डिझाईन, ह्युमॅनिटीज अशा अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून या विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोलापूर परिसरातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान (आयटी) इन्फ्रास्टक्चर असलेली सुसज्ज इमारत विद्यापीठ परिसरात उभारलेली आहे. पुढील काही दिवसात अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती माईंर्सं एमआयटी, पुणे शिक्षण समूहाच्या महासचिव आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्ष प्रा. स्वाती मु. चाटे यांनी दिली.