तुका आकाशाएवढा ...!
- प्रा. मधुकर वडोदे
Sant Tukaram Maharaj इतरांपेक्षा आपलं व्यक्तिमत्त्व वेगळं असावं, असं आपल्याला नेहमी वाटत असते. असं जेव्हा वाटायला लागते तेव्हा श्रेष्ठत्वाच्या कसोटीवर आपणास उतरावे लागते. जसे सर्वच विद्यार्थी दुसर्या-तिसर्या श्रेणीत उत्तीर्ण होत असतील आणि आपणास मात्र प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हायचे असेल तर आपणास इतरांपेक्षा अधिक परिश्रम करावे लागतील. Sant Tukaram Maharaj त्याकरिता अभ्यासातील उत्साह टिकून ठेवणं, सराव, सातत्य ठेवून अपार मेहनत घ्यावी लागेल. आपली जीवनशैलीच बदलून टाकावी लागेल. तासन् तास अभ्यास करावा लागेल. रात्रंदिवस पुस्तकांच्या व विषय शिक्षकांच्या सहवासात राहावे लागेल. येणार्या अनेक अडीअडचणींशी सामना करावा लागेल; तरच आपण आपलं वेगळेपण सिद्ध करू शकतो. Sant Tukaram Maharaj वेगळेपण सिद्ध करण्यासंबंधी प्रेरणात्मक विचार संत तुकाराम महाराजांना सांगायचा आहे. हे वेगळेपण सिद्ध करीत असताना प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची मानसिक तयारी करावी लागते. दु:खाला शरण न जाता त्यामधून मार्ग शोधता आला पाहिजे.
Sant Tukaram Maharaj अंधारावर मात केल्यास प्रकशाचं महत्त्व आपोआपच कळतं, ही बाब स्पष्ट करून सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात की,
तापल्यावांचून नव्हे अलंकार। पिटूनिया सार उरलें तें॥
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति। नासें शत्रू होती मित्र ते चि॥
कलेवर बरें भोगू द्यावें भोगा। फांसिले तें रोगा हातीं सुटे॥
तुका म्हणे मन करावे पाठेळ। साहावेचि जाळ सिजेवरी॥
अ. क्र. 2296
शरीर सौंदर्य खुलविण्याकरिता अधिक आकर्षक दिसण्याच्या हेतूने मौल्यवान असलेले सोन्यचे दागिने सर्वांना हवेहवेसे वाटतात. परंतु हा दागिना सोनार ज्या सोन्याच्या गोळ्यापासून बनवीत असतो तेव्हा त्यावर अनेक संस्कार करताना दिसतो. Sant Tukaram Maharaj त्याला पाहिजे तो आकार देण्याकरिता अग्नीच्या भट्टीत टाकत असतो. तो अग्नीचा दाह सोसण्यापलीकडचा असतानाही कुठलीही कुरबूर न करता निमूटपणे त्रास सहन करीत वेगळेपण सिद्ध करण्याकरिता सोनं हा सर्व त्रास सोसताना दिसते. मात्र, हे असे होत असताना त्याच्या सोबतचा शुद्ध भाग म्हणजे हीन मात्र निघून पडते. कारण त्याची आघात सोसण्याची क्षमता नसते. अशा वेळी असा हा शुद्ध भाग बरोबर नजरेस पडतो. Sant Tukaram Maharaj तो खर्या सोन्याची सोबती सोडून देतो. त्यामुळे शिल्लक राहते ते केवळ शुद्ध सोने.
आपलं शुद्धत्व सिद्ध करण्यासाठी व चांगलं मूल्य प्राप्त करण्यासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अग्नीचा दाह त्याला तर सोसावाच लागतो. त्यासोबतच सोनाराच्या हातोडीचेही अनेक घाव सहन करावे लागतात. त्यामुळे हिणकस भाग जाऊन शुद्ध सोन्याचा पाहिजे तसा अलंकार बनविण्याकरिता सोनाराजवळ हे शुद्ध सोनं शिल्लक राहत असते. मग अस्सल सोने हे त्याच्यापासून तयार केलेला दागिना सर्वांचं लक्ष स्वत:कडे केंद्रित करीत असताना दिसते. Sant Tukaram Maharaj माणसांच्या बाबतीत असेच आहे. त्याला आपलं चांगूलपण सिद्ध करण्यासाठी अनेक कसाट्या पार पाडाव्या लागतात. अनेक आघात सहन करावे लागतात. त्यामधून जात असताना स्वत:मधले अनेक दोष काढून टाकावे लागतात. हिनकस म्हणजे अहंकार सोडून द्यावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात केल्याशिवाय आपली वाटचाल अनुकूलतेकडे जात नाही. आपल्या जीवनात जर प्रखर उजेड पाडायचा असेल तर अंधारावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. त्याशिवाय आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार होणार नाही. जेव्हा अशा असह्य वेदना होत सहन कराव्या लागत असतात. Sant Tukaram Maharaj अनेक घाव अंगावर पडतात तेव्हा नकळतपणे आपल्या मनात त्याच्याविषयीची द्वेषाची भावना येऊन ती मनात ठिणगी पाडून जाते.
अधिक द्वेष भावना जागृत होतात. असा हा द्वेष मग बाळगून राग व्यक्त केला तर आपल्या अस्तित्वाला घडविणारे मित्र दूर जाऊ शकतात. कारण ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात. जर ऐकले नाही तर आपल्याला मग अनेक शत्रू तयार होऊ शकतात. असे होऊ नये त्याकरिता एक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणजे आपल्याला घडविणार्या विषयी आलेला राग व्यक्त करू नये. आपलं कार्य लक्षपूर्वक करावं. चांगली भावना आपल्या मनात रुजवावी. Sant Tukaram Maharaj अशा परिस्थितीत धैर्याने सामोरे जावं. यामध्येच आपलं हित असतं, हे जाणीवपूर्वक लक्षात असू द्यावं. ईश्वर प्राप्तीचं असेच आहे. कुणालाही तो पावत नाही. त्याकरिता असीम भक्तिभावानं पूजा करावी लागते. अनेक कसोट्यांना सामोरे जावं लागते. तेवढी सोसिकता असणे गरजेचे आहे. जसे लोणी हे दुधापासून तयार होत असले, तरी त्या दुधावर अनेक प्रकारचे संस्कार करावे लागतात. अनेक प्रक्रियांना सामोरे जावं लागतं आणि ज्याला त्याचं ज्ञान असतं तो त्यापासून दूर जात नाही. Sant Tukaram Maharaj कार्य आपल्या आवाक्यात आणण्यासाठी तेवढेच प्रयत्न करावे लागतात. असे कार्य करण्याची ज्याची मनापासून तयारी असेल तोच ईश्वर शोधण्यात यशस्वी होऊ शकतो.
महाराज सांगतात की, शरीर हे नाशिवंत असतं, हे लक्षात ठेवून काही ना काही व्याधी, रोग माणसावर आल्यास तर त्या रोगाच्या निवारणासाठी उपाययोजना कराव्या लागतील. वैद्याने सांगितल्याप्रमाणे उपचार करावे लागतील. मग त्यावेळी असह्य होणार्या वेदना या सहन कराव्याच लागतील. त्याशिवाय जडलेल्या रोगातून शरीर मुक्त होणार नाही. होत असलेला संपूर्ण त्रास सहन करावाच लागेल. त्याकरिता आपलं मन खंबीर करून त्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल. Sant Tukaram Maharaj त्याशिवाय मुक्ती नाही म्हणूनच अशावेळी आपलं मन हे ओझं वाहणार्या जनावराप्रमाणं ठेवून, आहे तो त्रास सहन करावा. येणार्या असंख्य संकटांना सक्षमपणे उभं राहून अडचणी सहनशीलतेने सोडवाव्या. कारण आपलं अस्तित्व सिद्ध करीत असताना संघर्ष अटळ आहे. अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. त्याशिवाय ते सिद्धच होत नाही. जसे ओझे वाहणारे जनावर त्याच्या पाठीवर कितीही ओझं ठेवले असता निमूटपणे सोसत पाहिजे त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाते. कुठलाही प्रतिकार ते करीत असताना दिसत नाही. त्याला कळते की, एवढं ओझं आपल्याला न्यावेच लागेल. तसेच जगात सहजासहजी काहीच मिळत नाही.
जेवढा त्रास सहन कराल तेवढे मोठे यश प्राप्त होत असते. सहजासहजी मिळालेल्या यशाला काहीच किंमत नसते. सहजासहजी मिळवणार्या वृत्तीचे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्यांची काहीच किंमत राहत नाही. हाच भावार्थ या अभंगामध्ये दडलेला आहे. प्रयत्नवादाच्या संदर्भातील एक उत्तम उदाहरण पाहू या. एक चिंपांझी जातीचे माकड चुकून मानवी वस्तीमध्ये आल्यामुळे त्याला बुद्धीच्या भरवशावर शिकारी माणसाने जाळ्यामध्ये अडकवून भल्या मोठ्या लोखंडी पिंजर्यात बंदिस्त केले. त्या पिंजर्यात त्याला खायला खूपच कमी अन्न ठेवले. Sant Tukaram Maharaj पाणीही अल्प प्रमाणात ठेवल्यामुळे त्याचे खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले. चार-पाच दिवसात झालेल्या हालामुळे ते माकड हतबल झाले. काय करावं समजत नव्हते. रात्रभर नुसतं किंचाळत होते. समोर मोठा संघर्ष उभा होता. परंतु काही वेळानं त्याच्या लक्षात आलं की, एवढ्या भल्यामोठ्या खूप उंच अशा पिंजर्याचा वरचा भाग खुला होता. परंतु, वरपर्यंत जाणे अशक्य होते. आणखी पुढचे दोन-तीन दिवस त्याने अडचणीत काढले. नंतर त्याच्या असे लक्षात आले की, त्या पिंजर्यात बरेच लहान-मोठे, जाड-बारीक असे लाकडाचे ठोकळे पडलेले होते.
आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरिता तो त्यावर होणारे आघात सोसत ठोकळ्यावर चढू पाहत होता. नंतर ठोकळ्यावर ठोकळा ठेवून पाहिलं व त्यावर चढण्याचा सराव तो करू लागला. परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. दररोज चढणे-पडणे सतत चालूच होते. असे बरेच दिवस चालू होते. मात्र, एक दिवस बरोबर योग्य अशा आकारमानानुसार ठोकळे रचण्यात तो यशस्वी झाला. त्यावर चढून त्या पिंजर्यातून व शिकार्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली. Sant Tukaram Maharaj अथक प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले. नेहमीप्रमाणे सकाळी तो शिकारी माणूस माकडाला थोडसं अन्न व पाणी घेऊन आला असता त्याला माकड दिसले नाही. पिंजरा खाली होता. तो स्वत:ला प्रश्न विचारू लागला, हे असे झालेच कसे? तो विचारात पडला होता. चिंपांझी जातीच्या माकडाला बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. इतर प्राण्यापेक्षा त्यानं आपलं वेगळंपण सिद्ध केलं होतं. Sant Tukaram Maharaj अनेक संकटाला सामोरे जात शिकारी माणसाला शत्रू न समजता व त्याच्यामध्ये वेळ न घालवता तो आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या मागे लागला होता.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज त्याने दिली होती आणि आपली सुटका करण्यास यशस्वी झाला होता. म्हणून माणसानं या घटनेवरून बोध घ्यावा, ज्याला आपलं जीवन यशस्वी करून दाखवावयाचे आहे त्याला कसोटीला उतरण्याचं धाडस करावंच लागेल. जसे स्वादिष्ट चव प्राप्त होण्याकरिता अन्नाला पूर्ण शिजवावे लागते. Sant Tukaram Maharaj म्हणजे ते पूर्ण शिजेपर्यंत त्या अन्नाला जाळाचे चटके सोसावे लागतात त्याचप्रमाणे आयुष्य उजळून टाकायचे असल्यास ते उजळेपर्यंत आघात सहन करण्याची क्षमता ही ठेवावीच लागते. हे घाव जो कोणी सोसत असतो तोच कर्तृत्ववान म्हणून नावारूपाला येतो व आपलं वेगळेपण सिद्ध करू शकतो.
9422200007