प्रत्येक विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टी यावी : सुमित वानखेडे

मॉडेल हायस्कूल परिसरात अंतरिक्ष महायात्रेचे आयोजन

    दिनांक :27-Aug-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
कारंजा (घा.), 
Sumit Wankhede ग्रामीण आणि शहरी असा विद्यार्थ्यांमध्ये भेद करणे योग्य होणार नाही. बुद्धी प्रत्येकालाच सारखी असते. दुर्दैवाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञाकिन दृष्टिकोन पोहोचू शकला नाही. ती भर आता निघू लागली आहे. शहरातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सुविधा ग्रामीण भागापर्यंतही पोहोचत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची माहिती मिळावी. त्यातूनच विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टी मिळावी यासाठी अंंतराळाची माहिती देणार्‍याा बसचा प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले.
 

Sumit Wankhede 
 
सुमित वानखेडे यांच्या पुढाकाराने विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर व भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो यांच्या संयुक्त वतीने स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय अंतरिक्ष महायात्रेत ते बोलत होते. Sumit Wankhede यावेळी भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शोभा काळे, सचिव संदीप काळे, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूरचे सचिव नरेश चाफेकर, रितेश जैन, मुख्याध्यापक एम. बी. टोपले उपस्थित होते.
 
वानखेडे पुुढे म्हणाले की, चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्विपणे पोहोचण्याची घटना जगासाठी ऐतिहासिक अशीच असून भारतीय वैज्ञानिकांनी देशाला गौरवान्वित केले. इस्त्रोची बस आर्वी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून नक्कीच उद्याचे वैज्ञानिक यातून तयार होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. Sumit Wankhede विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे त्याला विज्ञानाची जोड देऊन विकास साधता येतो असे शोभा काळे म्हणाल्या. इस्त्रोची कामगिरी, इस्त्रोचे योगदान आणि अंतराळ संशोधन या विषयी माहिती विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूरचे सचिव नरेश चाफेकर यांनी दिली. संदीप काळे यांनीही मार्गदर्शन केले.
 
याप्रसंगी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अंतराळासंबंधी पोस्टर व रांगोळी प्रदर्शनीचे मान्यवरांनी निरीक्षण केले. यावेळी मॉडेल कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य धनवटे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मंजुषा देशमुख, पर्यवेक्षक विनोद कहारे, अनिरुद्ध होनाडे, तालुक्यामधील इतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. बी. टोपले यांनी केले. संचालन सतीश गेडाम व शिक्षिका सुवर्णा गेडाम यांनी केले तर आभार योगेंद्र कांबळे यांनी मानले.