साखरखेर्डा नगरीतून कावड यात्रा उत्सव मिरवणूक

    दिनांक :28-Aug-2023
Total Views |
साखरखेर्डा, 
श्रावण महिन्यातील दुसर्‍या सोमवारी साखरखेर्डा नगरीतून Kavad Yatra कावड यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान शिवशंकरला श्रावण महिन्यात प्रसन्न करण्यासाठी ठिकठिकाणी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते . सकाळी चार वाजता दुधा ब्रम्हपूरी येथील ओलांडेश्वर मंदीरात पैनगंगा नदीच्या पात्रात पुजा करुन तेथील नदीतील जल घेऊन यात्रेला सुरुवात केली जाते.
 
Kavad Yatra
 
कावडधारी युवक ते जल घेऊन साखरखेर्डा नगरीत पोहचताच Kavad Yatra भोगावती नदीवरील पुलावरून कावड यात्रा मिरवणूकीला सुरुवात झाली . वाजतगाजत मिरवणूक माळीपुरा , महात्मा फुले नगरातून , अहिल्याबाई होळकर, म्हसोबा चौक , गुजरी चौक , मेनरोडने शिवाजी व्यायाम शाळा , त्र्यबेकेश्वर महादेव मंदीर , श्री पलसिध्द महास्वामी मठ , रोकडोबा हनुमान मंदीर , बसस्थानक , महाराणा प्रताप नगर अशी मिरवणूक काढण्यात आली . भोगावती नदीवरील महादेव मंदीरात भगवान शिवशंकराला जलाभिषेक करण्यात आला . गावातील सर्वच मंदिरात भगवान शंकराला जलाभिषेक करण्यात आला . मिरवणुकीत हर हर महादेव , जय शिवशकंर भोलेनाथ की जय असे नारे देण्यात आले.
 
 
यावर्षी साखरखेर्डा भागात पावसाची प्रतिक्षा करावी लागत असून तीन महिन्यांत एकदाही दमदार पाऊस पडलेला नाही . नदी , नाले , विहीरी कोरड्या आहेत . पिकाची परिस्थिती समाधानकारक नाही . Kavad Yatra कपाशी गेल्यात जमा आहे . मूग , उडीद पाहायला मिळणार नाही . सोयाबीन कसेतरी तग धरून आहे . ही परिस्थिती निर्माण होऊ शकते . कोरडा दुष्काळ पडला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते . यासाठी सरपंच सुमन सुनिल जगताप , ग्राम पंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी , युवा शिवसेना तालुका प्रमुख संदीप मगर यांचेसह हजारो शिवभक्तांनी शिशशंकराला जलाभिषेक करताना पाऊसासाठी प्रार्थना केली.
 
 
महाराणा प्रताप नगरातून सुध्दा Kavad Yatra कावड यात्रा काढण्यात आली . यात्रेत युवक , महिला , पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . नगरातून कावड यात्रा मार्गक्रमण करीत असताना सुवासिनी महिलांनी मनोभावे पूजा करुन यात्रेचे स्वागत केले . यावेळी माजी उपसरपंच रामदाससींग राजपूत , गोपालसींग राजपूत , संग्रामसींग राजपूत , बंडू खरात , भागवत मंडळकर , मयुर जैस्वाल यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.