कोरोना टाळेबंदीनंतर बालविवाहाचे प्रमाण वाढले

29 Aug 2023 18:54:41
- रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन
 
लातूर, 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीनंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या लातूरमध्ये 37 बालविवाह थांबविण्यात आले असून, यातील दोन घटनांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष Rupali Chakankar रूपाली चाकणकर यांनी पत्रपरिषदेत दिली. मात्र, त्यांनी महाराष्ट्रात वाढत्या बालविवाहांसंदर्भात आकडेवारी किंवा कालमर्यादा स्पष्टपणे सांगितली नाही.
 
 
Rupali dksl
 
ग्रामसभांनी बालविवाहांना काटेकोरपणे आळा घालण्यासाठी ठराव पास केले पाहिजेत आणि विवाहाची निमंत्रण पत्रिका छापणार्‍या कुटुंबांसह सर्व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मोबाईल फोन व इतर प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे पालक आणि मुलांदरम्यानच्या संवादात अंतर निर्माण झाले आहे व त्यामुळे मुली प्रेमात पडतात व पळून जातात, असा दावा चाकणकर यांनी केला आहे.
 
 
पोलिसांच्या ‘दामिनी पथकाने’ मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्याशी अधिक संवाद साधला पाहिजे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक‘मांतर्गत आयोगाने 28 जिल्ह्यांतील सुमारे 18,000 तक्रारींचे निराकरण केले आहे. सोमवारी आम्हाला लातूरमध्ये 93 तक्रारी प्राप्त झाल्या असून, तीन पॅनेल त्या तक्रारीचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी काम करतील, असे त्या Rupali Chakankar म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0