महाराजबाग प्राणीसंग्रहालयाच्या विकास आराखड्यास मंजुरी

    दिनांक :03-Aug-2023
Total Views |
नागपूर, 
शहरातील नागरिकांना निसर्ग सानिध्यात फिरण्यासाठी हक्काचे ठिकाण असलेले (Maharaj Bagh Zoo) महाराजबाग प्राणीसंग्रहालय हे अद्यायावत सुविधांनी युक्त असावे अशी मागणी महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची होती. त्यामुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालयाच्या वतीने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे विकास आराखड्याची परवानगी काही महिन्यांपूर्वी मागितली होती. त्याला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
 
Maharaj Bagh Zoo
 
सुमारे शंभर वर्षाहून अधिक जूने अशी (Maharaj Bagh Zoo) महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची ओळख आहे. आजच्या आधुनिक युगात या प्राणीसंग्रहालयातही अद्यायावत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. त्यानुसार काही विकासकामे करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडे सर्वप्रथम सन २०११ मध्ये विकास आराखडा सादर करण्यात आला होता. सदर बृहत विकास आराखड्यात त्रुटींमुळे ४ वेळेस सुधारणा करण्यासाठी हा परत करण्यात आला. वेळोवेळी महाराजबाग प्रशासनाने सुधारणा करून १४ डिसेंबर २०२२ रोजी सादर केला असता त्याला अखेर परवानगी दिली आहे.
 
 
यात (Maharaj Bagh Zoo) प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापण, वन्यप्राणी देखरेख तसेच त्यांची qपजरे, प्रेक्षकांसाठी बसण्याचे ठिकाण, इतर विकासात्मक कामे आता या प्राणीसंग्रहालयात होणार आहे. जवळपास शंभर कोटींचा निधी यासाठी लागणार आहे. महाराजबाग प्राणीसंग्रहालयाच्या विकासाच्या दृष्टीने विकास आराखड्यास मंजूरी महत्त्वाची असून, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार प्राणीसंग्रहालयाचा विकासासाठी शासनाकडे मदत मागण्यात येईल अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.