यवतमाळ,
येथील ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य Dr. Veena Khan डॉ. वीणा फरहत खान यांचे बुधवार, 2 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वाजता किडनी विकाराने निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आयुर्वेदाचार्य डॉ. फरहत खान, अॅड. शिरीन व अॅड. ईशा या मुली आणि मोठा परिवार आहे.
Dr. Veena Khan डॉ. वीणा खान या पूर्वाश्रमीच्या माया श्रीनिवास देशपांडे असून त्यांचा 36 वर्षांपूर्वी डॉ. फरहत खान यांच्याशी विवाह झाला होता. एक यशस्वी वैवाहिक जीवनाचे उदाहरण आणि आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक म्हणून त्यांच्या या विवाहाकडे यवतमाळात पाहिल्या जाई. कै. वीणा खान यांच्यावर गुरुवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी येथील हिंदू मोक्षधामात वैदिक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या अॅड. शिरीन व अॅड. ईशा यांनी अग्निसंस्कार केले. यावेळी अनेक हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या शोकसभेत डॉ. टी. सी. राठोड, राजेंद्र डांगे, डॉ. अशोक कांबळे, अमर दिनकर व डॉ. विजय अग‘वाल यांनी डॉ. वीणा खान यांना श्रद्धांजली वाहिली.