तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Meri Mitti,Mera Desh जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम, आणि साक्षरता निर्माण व्हावी. यासाठी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.या अभियानात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देणयाचे आवाहन त्यांनी केले आहे. या कार्यक‘माच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायत स्तरावर 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान गावातील संस्मरणीय अमृत सरोवर, शाळा ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे.
वसुधा वंदन यामध्ये वृक्षांच्या रोपाची लागवड, निवृत विरांचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शाळेत पंचप्राण प्रतिज्ञा, ध्वजारोहण कार्यक्रम,ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपवावी. Meri Mitti,Mera Desh या सर्व उपक्रम राबविण्यावत कृती आराखडा कार्यक्रमा आधी विशेष ग्रामसभा घेवून याबाबतचा ठराव करण्यात यावा.15 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान माती कलशामध्ये गोळा करणे व ती दिली येथे होणार्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पाठवणे असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाकरिता तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.