किन्हाळा ग्रामपंचायत प्रोसेडींगवर खोडतोड

03 Aug 2023 20:24:27
तभा वृत्तसेवा
तळेगाव (शा. पंत),
आष्टी तालुक्यातील गट ग्रामपंचायत किन्हाळा येथील (Kinhala GramPanchayat) ग्रामपंचायतमध्ये ग्रामसचिवाच्या डोळ्यांदेखात प्रोसेडींग रजिस्टरवर सरपंचाच्या सहमतीने 31 जुलै रोजी खाडाखोड करण्यात आली. या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रापं सदस्य प्रदीप पाथरे आणि किशोर टेकाम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.
 
Kinhala GramPanchayat
 
तालुक्यातील (Kinhala GramPanchayat) किन्हाळा ग्रामपंचायत कार्यालयात 31 जुलै रोजी मासिक सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला ग्रामसचिव लोहे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य प्रदीप पाथरे, किशोर टेकाम उपस्थित होते. यावेळी विषय सूचीवर दलित वस्तीचे सिमेंट रस्त्याचे काम हा विषय नव्हता तरीही सरपंचांनी तो विषय जबरदस्तीने घ्यायला लावला आणि विषय घेतल्यावर प्रोसेडींग ग्राम सचिवाने लिहून पूर्ण केले. त्यानंतर सरपंचांनी स्वाक्षरी केली तर सदस्यांनी स्वाक्षरी करण्यास विरोध केला. त्यावेळी सरपंचांच्या नातेवाईकांनी प्रोसेडींग बुक हिसकावून त्यावर खोडतोड केली. खोडतोड केली म्हणून ग्रामसचिवांनी आपले मत लिहून ठेवले. प्रोसेडींग रजिस्टरवर सरपंचांचे नातेवाईक खोडतोड असे करू शकतो असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. ग्रापं सदस्य प्रदीप पाथरे, किशोर टेकाम यांनी या घटनेची तक्रार गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना केली आहे तर आ. दादाराव केचे यांना घटनेची माहिती दिली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
 
 
किन्हाळा ग्रामपंचायतची Kinhala GramPanchayat मासिक सभा 31 जुलै रोजी घेण्यात आली. मासिक सभेत विषय सूचीवर विषय नसताना आपल्याला जबरदस्तीने हा विषय घेण्यास बाध्य केले. माझ्या डोळ्यसमोर सरपंचांच्या मुलाने प्रोसेडींग रजिस्टरवर खोडतोड केली. याला माझा विरोध होता. यावर ग्रामपंचायत सदस्य यांनी आक्षेप घेतला तो सत्य आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिव प्रीतम लोहे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0