मानोरा,
ashram school मानोरा विमुक्त जाती व भटया जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवणार्या वाई गौळ येथील तपस्वी काशिनाथ बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे बाहेरगावी स्थलांतर करू नये अशा आशयाचा ठराव ग्रामपंचायत वाई गौळ यांनी घेतला असून, सदर ठरावाद्वारे समाज कल्याण विभागाला ग्रामपंचायत ने मागणी केली आहे.
तपस्वी काशिनाथ बाबा आश्रम शाळेबाबत गावातील दोन व्यक्तींनी समाज कल्याण विभागाला तक्रारी दिल्या होत्या. त्याची चौकशी समाज कल्याण विभागाने केली असता आश्रम शाळेमध्ये मुला व मुलीसाठी काही सुविधा बाबत काही उणीवा आढळल्या असल्या तर आश्रम शाळेचे प्रशासन त्या दूर करतील. गेल्या अनेक वर्षापासून ही आश्रम शाळा आहे, परीसरातील अनेक गरीब शेतमजूर पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना घडवत आहे. येथील अनेक युवक ashram school आश्रम शाळेत शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे अनेकाचे भविष्य घडविणार्या शाळेचे स्थलांतर झाले तर वाई गौळ परीसरातील विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे आश्रम शाळेचे स्थलांतर करू नये असा ठराव येथील सरपंच उमेश राठोड यांच्या वतीने सर्वामुमते घेतला असून, सदर ठरावाची प्रत ग्रामपंचायतीने समाज कल्याण अधिकारी यांना ३१ जुलै रोजी दिला आहे. यावर समाज कल्याण विभाग कोणती भुमीका घेते याकडे वाई गौळ परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.