नवी दिल्ली,
Prime Minister Modi : स्वत: काम करायचे नाही आणि इतरांनाही करू द्यायचे नाही, असे नकारात्मक राजकारण आपल्या देशातील विरोधी पक्ष करीत आहे. आता त्यांची ती मानसिकताच झाली आहे. तुम्ही कितीही काही केले तरी, भ्रष्टाचारी आणि घराणेशाही जोपासणार्यांना पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही, असा पक्का निर्धार देशातील नागरिकांनी केला आहे, हे लक्षात ठेवा, अशा कणखर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी रविवारी विरोधकांवर हल्ला चढविला.
पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या हस्ते आज देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते आभासी माध्यमातून बोलत होते. यात महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. नकारात्मक राजकारणाशिवाय दुसरे काहीच करायचे नाही, ही एकमेव भूमिका विरोधकांनी स्वीकारली आहे. संसदेची नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात आली. मात्र, विरोधकांनी त्याचाही विरोध केला. देशात 70 वर्षे सत्ता गाजविणार्या काँगे‘सने हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी युद्ध स्मारक बांधले नाही. आमच्या सरकारने ते बांधले असता, विरोधकांनी त्याचाही निर्लज्जपणे विरोध केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्यात आला. सर्व भारतीयांना याचा अभिमान वाटतो. विरोधी पक्षातील एकाही नेत्याने या स्थळाला भेट देण्याचे औचित्य दाखविले नाही, असा आरोप (Prime Minister Modi) पंतप्रधानांनी केला.
‘क्विट इंडिया’
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘भारत छोडो’ अर्थात् ‘क्विट इंडिया’ आंदोलनाचा संदर्भ दिला. या आंदोलनाचा प्रभाव जनतेवर आजही आहे आणि म्हणूनच भ‘ष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टिकरणाचे राजकारण देशातून हद्दपार करण्याची तयारी देशवासीयांनी केली आहे, असे पंतप्रधान (Prime Minister Modi) म्हणाले.
जगाचा द़ृष्टिकोन बदलला
भारताकडे पाहण्याचा जगाचा द़ृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला आहे. त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, तीन दशकांनंतर नागरिकांनी संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले आणि दुसरे म्हणजे, या बहुमताच्या सरकारने देशापुढील आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी एकापाठोपाठ अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, याकडे (Prime Minister Modi) मोदी यांनी लक्ष वेधले.