तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
जागतिक आदिवासी दिनी World Tribal Day बुधवार, 9 ऑगस्ट रोजी यवतमाळात विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोमवार, 7 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी सागर पुरी, मीनाक्षी सावळकर, रवी चांदेकर, मनोहर सहारे हे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना सागर पुरी म्हणाल्या, मणिपूरमध्ये निरपराध माणसे जळताहेत. तिथे स्त्रियांना नग्न करून फिरविल्या गेले आहे. जाती-धर्मात भांडणे लावून दिल्या जात आहेत. महापुरुषांना विनाकारण बदनाम केल्या जात आहे.
ही सर्व कामे आणि महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत केंद्रातील सरकार शांत आहे. या World Tribal Day घटनांवरचे मौन यातून केंद्र सरकारची उदासीनताच दिसून येत आहे. या विरोधात या जनआक‘ोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे या पत्रपरिषदेत सांगण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला सहभागी होणार आहेत. तसेच या मोर्चात सर्व समाजातील सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील विविध 28 संघटनांचा यात सहभाग राहणार आहे. हा मोर्चा आझाद मैदान ते एलआयसी चौक जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे.