नागपूर,
Kamgar Kalyan Kendra-NGP चंदननगर वस्तीमध्ये कामगारांच्या कल्याणासाठी 40-45 वर्षांपूर्वी कामगार कल्याण केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. या केंद्रामध्ये कामगारांच्या कुटुंबांकरिता नाटक, क्रीडा स्पर्धा आदी मनोरंजनाचे आणि कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वर्षभर घेतले जात असत. Kamgar Kalyan Kendra-NGP येथे सर्वसामान्यांना वाचनासाठी वर्तमानपत्रे उपलबध होत असत आणि ग्रंथालयाचीही सोय होती. विविध विषयांवरील पुस्तके येथे वाचनासाठी उपलब्ध व्हायची. Kamgar Kalyan Kendra-NGP लहान मुलांना शिकविण्यासाठी अंगणवाडीचा सुद्धा उपक्रम याच परिसरात चालू आहे.

परंतु काही दिवसांपूर्वी केंद्राच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याचे कारण देऊन समाज कल्याण विभागाने चंदननगरातील कामगार कल्याण केंद्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Kamgar Kalyan Kendra-NGP हा निर्णय चंदननगर, वकीलपेठ, उंटखाना, सिरसपेठमधील कामगारांना व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मान्य नाही. त्याबद्दल सर्वत्र नाराजी पसरली आहे. चंदननगरचे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बंद न करता, ते नियमित चालू ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या Kamgar Kalyan Kendra-NGP कामगार कल्याण केंद्राच्या उभारणीसाठी कामगारांचा पैसा लागला आहे, याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या मागणीची सरकारने त्वरेने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौजन्य : राजेश हरडे, संपर्क मित्र