पावसाअभावी पिकांची स्थिती चिंताजनक

01 Sep 2023 15:43:57
नागपूर,
lack of rain एकीकडे पावसाने दडी मारल्याने उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. गत दहा दिवसांपासून नागपूरसह विदर्भातून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. येत्या दोन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास पीक करपण्याचे संकट शेतकर्‍यांवर घोंगावणार आहे.मुख्यत: सर्वाधिक पावसाचा महिना ऑगस्ट, मात्र 2016 नंतर पहिल्यांदाच या महिन्यात सर्वात कमी म्हणजे 199 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
 
 
lack of rain
गतवर्षी ऑगस्टमध्ये 389 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार- पाच दिवसपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून जोरदार पावसासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. lack of rain गुरुवारी दुपारनंतर 3.30 वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण झाल्यानंतर हिंगणा-वाडी भागात अर्धा तासपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. परंतू नागपूर शहरात इतरत्र कुठेही पाऊस झाला नाही.शुक्रवारी नागपूरचे तापमान 34 अंशांवर होते. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असल्याने उकाड्याचा त्रास सहण करावा लागला. आता पोळा,अनंत चतुर्दशी, घटस्थापनेच्या दरम्यान दमदार पाऊस झाल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.
Powered By Sangraha 9.0