तभा वृत्तसेवा
दारव्हा,
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची वास्तू जुनी असून, Darwa Bus Stand बसस्थानकात सुविधांची सर्वत्र वानवा आहे. रस्ते, स्वच्छतागृह, उपहारगृह या सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी करोडो रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून बसस्थानकाच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता. मात्र निधीअभावी बसस्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाला अजूनही मुहर्त मिळालेला नाही. यामुळे पालकमंत्र्यांच्या गृह तालुक्यातील बसस्थानकाची दुर्दशा कधी दूर होणार, असा प्रश्न शहर व तालुक्यातील हजारो नागरिक विचारत आहेत.
दारव्हा तालुक्याच्या Darwa Bus Stand ठिकाणी असलेले एसटी महामंडळाचे बसस्थानक सुरवातीपासूनच प्रवाशांना सुविधा देण्यास असमर्थ ठरले आहे. या बसस्थानकाच्या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी स्वच्छ्तागृहाची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. तसेच प्रवाशांना उपहारगृह व यासह अन्य पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे प्रवाशांची हेळसांड होत असल्याचे दिसून येते. येथील बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे ठिकाण आहे. प्रवाशांसह बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्रवासी व बसची सं‘या पाहता सद्यःस्थितीत बसस्थानक अत्यंत गैरसोयीचे झालेले आहे.
बसस्थानकाची इमारत Darwa Bus Stand ही जुनी असल्याने मोडकळीस आलेली आहे. स्वच्छतागृह, कर्मचारी विश्रांतिगृह, पोलिस चौकी, चौकशी केंद्र, पार्किंग व्यवस्था या सुविधा नसल्याने बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकाच्या इमारतीचे नूतनीकरण व दुरुस्तीसाठी तत्कालीन वनमंत्री व विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून 1.25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तीन वर्ष उलटल्यानंतरही अद्यापसुद्धा बसस्थानकाला नूतनीकरणाची प्रतीक्षा आहे. यामुळे गृह तालुक्यातील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी जनतेची आग‘ही मागणी आहे.
पुन्हा नव्याने निविदा काढण्याच्या सूचना
दारव्हा मध्यवर्ती Darwa Bus Stand बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी 1.25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर प्रशासकीय मान्यता घेऊन सुधारणा करण्यात आली. त्यामुळे नव्याने मंजुरीची प्रकि‘या राबविण्यात आली. नंतरच्या कालावधीत कोरोनामुळे निविदा प्रकि‘या रद्द करण्यात आली होती. त्यानंतर एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा निविदा काढण्याच्या सूचना मिळाल्या नाही. आता पुन्हा नव्याने निविदा काढण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. नवीन वाढीव रकमेची निविदा एक ते दीड महिन्यात निघेल. आता वरिष्ठ कार्यालयातून माहिती घेऊन या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.