मालेगांव,
Narahari Sonar Maharaj Temple शहरांतील नागरदास रोड वरील जागेवर संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज व विठ्ठल रुख्मिणीचे नविन मंदिरासाठी येथील जागेवर मंदिराचा भुमिपुजन सोहळा उपस्थितीत संत महंत यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये ८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचे भव्यदिव्य मंदिर शहरात नागरतास रोडवरील नविन जागेत निर्माणाधिन होणार असून या मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. सदर भूमिपूजन सोहळा पुजारी वाशीम येथील वेदशास्त्री आचार्य शशिकांत देव महाराज, यांच्या पौरोहित्या खाली संपन्न झाला. Narahari Sonar Maharaj Temple याप्रसंगी भूमिपुजन सिध्देश्वर संस्थानचे शांती पुरी महाराज, विदर्भ रत्न तथा रामायनाचर्य संजय बाबा पाचपोर , वजय महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे. यावेळी सोनार समाजातील परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुरवातीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितीत महाराजांच्या शुभहस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संचालन डॉ पूजा भांडेकर व कुमुद अस्टोनकर यांनी केले.