तिरोडा,
Saraswati Shishu Temple स्थानिक सरस्वती शिशु मंदिरात दहीकाला उत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेच्या प्रांगणात आयोजित दहीकाला उत्सवाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन अतिथी हस्ते करून करण्यात आली. याप्रसंगी विद्या जोशी, विष्णूदयाल बिसेन, प्राचार्य विशाल वेरुळकर आदींनी पूजन केले.
या नंतर विद्यार्थ्यानी कृष्ण व राधेच्या भूमिकेत गीत, नृत्य, व नाट्य छटा सादर केले. कृष्णाच्या जीवनावर कथेच्या माध्यमातून विद्या जोशी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी हंडी फोड स्पर्धेत हिरहिरीने भाग घेतला. तसेच मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. त्यानंतर दहीकाला सर्वांना वितरित करण्यात आला. Saraswati Shishu Temple कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका माया मलघाते, मीनल रोडके, मनीषा कांबळे, सुषमा देशमुख, जयश्री राहांगडाले, अश्विनी तितिरमारे, विजया नागपुरे, निशा धबाले, कल्पणा राऊत, राजश्री रहांगडाले, शिक्षकेतर कर्मचारी अमोल कोटांगले, श्रीमती शेंडे, श्रीमती देव्हारे यांनी परिश्रम घेतले. संचालन सुषमा देशमुख यांनी केले. आभार कांबळे यांनी मानले.