रिसोड,
Amardas Baba येथील श्री संत अमरदास बाबा यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमीत्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ९ ते १६ सप्टेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
९ सप्टेंबर पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भागवत कथा प्रवक्ते म्हणून हभप नित्यानंद महाराज पंढरपूर यांचे दररोज दुपारी १ ते ५ भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबर ला श्री चा रुद्राक्ष अभिषेक कार्यक्रम हा रात्री नऊ ते अकरा होणार असून त्यानंतर श्री ची महाआरती होणार आहे. Amardas Baba तसेच १६ सप्टेंबर ला श्री च्या नगर परिक्रमा पालखी सोहळा सकाळी ७ वाजता संस्थांनमधून निघणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक दुपारी ३ वाजता मंदिरात परत आल्यानंतर श्री च्या पालखीची महाआरती होणार व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री संत अमरदास बाबा संस्थान रिसोड यांनी केले आहे.