अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा

मराठी साहित्य, कला सेवा राष्ट्रकुटचा उपक्रम

    दिनांक :11-Sep-2023
Total Views |
- गुरुदत्त वाकदेकर
 
मुंबई, 
Marathi Literature : मराठी साहित्य व कला सेवा संस्थेतर्फे अनेक साहित्यिक स्पर्धा, संमेलने आणि उपक्रम नि:शुल्क राबविले जातात. त्यातून अनेकांना अधिक सक्षमपणे लिहिण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लाभले. संस्थेशी जोडलेल्या अनेकांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम गणेशोत्सवानिमित्त घेण्यात येत आहे. 19 सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्य व कला सेवा-राष्ट्रकुट गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
 
Marathi Literature
 
प्रस्थापित तसेच नवोदित कवी-कवयित्री यांच्या गणपतीवरील रचनांचे प्रसारण राष्ट्रकुट यूट्युब वाहिनीवरून करण्यात येणार आहे. ज्यांना सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नावनोंदणी 18 सप्टेंबरपर्यंत करणे अनिवार्य आहे. या (Marathi Literature)  उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही. सहभागासाठी कविता, अभंग, गीत, गजल मराठी भाषेत तसेच स्वलिखित असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागींना आपली एकच रचना तीन मिनिटांपर्यंत सादर करता येईल. कविता जास्तीतजास्त 20 ओळी, अभंग 7 चरणं, गीत 4 कडवी, गजल 5 शेर ही मर्यादा आहे. सहभागींना दोन स्वतंत्र व्हिडीओ पाठवायचे आहेत.