विवेकानंद विद्या मंदिराचे विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत विभागस्तरावर

    दिनांक :11-Sep-2023
Total Views |
हिवरा आश्रम, 
येथील शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित Vivekananda Vidya Mandir  विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत विजयी होवून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. बुलडाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. 10 रोजी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
Vivekananda Vidya Mandir
 
या कुस्ती स्पर्धेत विवेकानंद विद्या मंदिर Vivekananda Vidya Mandir  व कनिष्ठ महाविद्यालय हिवरा आश्रम मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर विजय मिळवून त्यांची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे. यामध्ये 14 वर्षे वयोगटातून शिवा हिरालाल यादव तर 17 वर्षे वयोगट सुजित दिपकराव देशमुख, नरेंद्रसिंग हिरालाल यादव, ओम निलेश हिवलेकर तर मुलींमध्ये वैष्णवी संतोष गारोळे, दिव्याणी संतोष शेळके, वैष्णवी स्वप्निल सास्ते यांचा समावेश आहे. कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची तयारी क्रिडाशिक्षक रंजीत जाधव,आत्मानंद थोरहाते, गोविंद अवचार, शाम खरात,विजय गोरे यांनी करून घेतली. खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, पुरुषोत्तम अकोटकर,मुख्याध्यापक आर.डी. पवार ,पर्यवेक्षक के व्ही टवलारे, एस एल भारती यांनी कौतुक केले.