अल्पवयीन मुलांची दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय

* 7 दुचाकी जप्त, अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

    दिनांक :12-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
कारंजा (घा.), 
तालुक्यात अल्पवयीन मुलांची दुचाकी Bike stealing gang चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे नुकतेच उघडकीस आले. 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर गस्तीदरम्यान पोलिस निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक फौजदार लिलाधर उकंडे, विनोद वानखडे, नीतेश वैद्य, निखील वाणे, खुशाल चाफले, अमोल मानमोडे यांनी गोळीबार चौकात नाकेबंदी केली.
 
Bike stealing gang
 
निखील हजारे (26) रा. आष्टी हा Bike stealing gang दुचाकीने नागपूरला जात असताना पोलिसांनी त्याला थांबविले. विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्याला पोलिस ठाण्यात बोलावून विचारपूस केली. त्याने काही अल्पवयीन मुलांची नावे सांगून त्यांनी दुचाकी चोरून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी 4 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या. 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डी. एस. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील गाडे, लीलाधर उकंडे, विनोद वानखडे, नीतेश वैद्य, निखील वाणे, दिनेश पसाड, खुशाल चाफले, अमोल मानमोडे आदींनी केली.