क्लोनिंगद्वारे पहिली मेंढी जन्माला घालणारे इयान विल्मोट यांचे निधन

12 Sep 2023 18:29:55
लंडन, 
Ian Wilmot : जगातील पहिली क्लोन सस्तन मेंढी (डॉली) तयार करणारे प्रसिद्ध बि‘टिश भ‘ूणशास्त्रज्ञ सर इयान विल्मुट यांचे निधन झाले. 2018 मध्ये पार्किन्सन आजाराचे निदान झाल्यानंतर वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रोफेसर विल्मुट यांनी 5 जुलै 1996 रोजी जन्मलेल्या डॉलीची निर्मिती करण्यासाठी एडिनबर्ग विद्यापीठातील रोझलिन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याने स्टेम सेल संशोधनाचा पाया घातला.
 
Ian Wilmot
 
इयान विल्मोट (Ian Wilmot) यांचा जन्म इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉनजवळ झाला. भ्रूणविज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शेती विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भ्रूणशास्त्रीय संशोधनातही लक्षवेधी कार्य केले. त्यानंतर 2005 मध्ये ते एडिनबर्ग विद्यापीठात दाखल झाले आणि 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले. 22 फेब्रुवारी 1997 ही तारीख इतिहासात एका मोठ्या घटनेसह नोंदली गेली. या दिवशी स्कॉटलंडमधील रॉस्लिन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या पथकाने एक मोठी घोषणा केली. सस्तन प्राण्यांच्या पेशीपासून क्लोन तयार संशोधकांना यश आले आहे. त्यातून एका मेंढीचा जन्म झाला आहे, अशी ती घोषणा होती. या घटनेला दशकातील सर्वांत मोठी घटना म्हटले गेले.
 
 
डॉली (Ian Wilmot) नावाच्या क्लोन मेंढीचा जन्म प्रत्यक्षात 5 जुलै 1996 रोजी झाला होता; मात्र सात महिन्यांनंतर फेब्रुवारीमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. डॉलीने तिच्या वयाच्या दुसर्‍या वर्षी पहिल्या कोकराला जन्म दिला. त्याचे नाव बोनी ठेवण्यात आले. यानंतर डॉलीने एकदा जुळ्या आणि नंतर तिळ्या कोकरांना जन्म दिला. सप्टेंबर 2000 मध्ये डॉलीने शेवटच्या कोकराला जन्म दिला. त्यादरम्यान डॉलीला फुफ्फुसाचा कर्करोग आणि संधिवात झाल्याचे निदान झाले होते. अखेर संशोधकांनी 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉलीचे इच्छामृत्यूच्या माध्यमातून जीवन संपवले.
Powered By Sangraha 9.0