नवी दिल्ली,
Gajendra Shekhawat : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. या टीकेनंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदयनिधींच्या टीकेला उत्तर देताना थेट धमकी दिली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सध्या देशात सनातन धर्मावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. कारण, उदयनिधी यांनी डेंगू, मलेरियाशी सनातनची तुलना केली होती. या शाब्दिक टीकेचे रुपांतर आता थेट जीभ खेचू आणि डोळे काढू, अशा धमकीपर्यंत जाऊन पोहचले आहे. (Gajendra Shekhawat) केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदयनिधी यांना उत्तर देताना सनातनवर टीका करणार्यांची डोळे काढू आणि जीभ खेचू, असा इशारा दिला. याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही आता या वादात उडी घेतली उदयनिधीवर शाब्दिक हल्ला चढविला आहे.