इंग्रज कालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा फुटला

13 Sep 2023 12:57:06
तळोधी (बा)
Ghodazari lake इंग्रज कालीन घोडाझरी तलावाचा येनोली माल जवळील मुख्य कॅनल 55 च्या पुलिया जवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नुकसान झाली आहे. त्या ठिकाणावर पहिलेच मोठे भगदाड पडले होते मात्र त्याठिकाणी नहर सुरू करण्यासाठी थातुरमातुर पध्दतीने तिथे चुगड्या लावून ठेवल्या होत्या व शेतीला पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाने कालवा व वितरिकांमधील झाडे, गाळ, रेती, माती व कचरा वेळीच साफ न केल्यानेच सदर परिस्थिती उद्भवळ्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 
 
घोडाझरी
 
अलीकडे मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, तलाव तुडुंब भरली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची गरज लक्षात घेऊन तलावाचे पाणी सोडण्यात आले. दरम्यान घोडाझरी तलावाचा येनोली माल जवळील मुख्य कालवा बुधवारी पहाटे च्या सुमारास फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी अतोनात हानी झाली आहे.Ghodazari lake खरं तर तलावाचे पाणी सोडते वेळी कालवे व वितरिकांना साफ केल्या जाते. कारण कालवे व मुख्य वितरिकांमध्येच मोठं- मोठी झाडें तयार झालीत. शिवाय गाळ,रेती, माती,कचरा साचला असताना केवळ थातूर मातुर सफाई करून पाणी सोडण्यात आले. मुख्य वितारिकेला ठिकठिकाणी मोठे मोठे भगदाड पडले असून फक्त घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्त भुजवतात मात्र ते भगदाड अजूनही भुजविले नाही फक्त धातूरमातूर पद्धतीने बुजवून पाणी सोडले जाते. वितरिकांची दयनीय परिस्थिती असताना पाटबंधारे विभागाने दिरंगाई केली परिणामी घोडाझरी तलावाचा कालवा फुटला.या सर्व बाबीला पाटबंधारे विभाग दोषी आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.आहे. मात्र सिंचन विभाग या गंभीर बाबीकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप येथील शेतकरी वर्ग करीत आहे.
आता वितरिका झाल्या कमकुवत
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सुविधा व्हावी.या दूरदृष्टीतून इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात 'घोडाझरी' या मोठया तलावाची निर्मिती केली.आणि त्या तलावाच्या कालव्यांना अनेक वितरिका जोडल्या.मात्र हया वितरिका व कालवे आता बरीच वर्ष झाल्याने कमकुवत व्हायला लागले आहे.जागो जागी भगदाड पडलेले आहे तर कुठे खचलेले आहे.त्यामुळे तेथे झाडें व कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.मात्र संबंधित विभागाने अजून प्रयन्त तरी यां वितरिकांची डागडुजी शिवाय पक्के बांधकाम केले नसल्याची माहिती आहे. यावरून शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी किती तत्पर आहे. हे लक्षात येते.
Powered By Sangraha 9.0