गुरुकुल शाळेत अंतराळ प्रदर्शनी ‘स्पेस ऑन व्हिल’ महायात्रा

13 Sep 2023 16:49:54
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा
Gurukul School स्थानिक गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, नागपुर, इसरो, गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ प्रदर्शनी ‘स्पेस ऑन व्हिल’ अंतरिक्ष महायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना अंतरिक्ष, ग्रह, तारे, चांद्रयान मोहीम, इस्रो, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह,वैज्ञानिक व त्यांचे कार्य इत्यादी बाबींविषयी माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
गुरुकुल
 
यावेळी विद्यार्थ्यांकरीता रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी इस्रोच्या बस प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमा करीता न्यायाधीश हेमंत सातभाई, कादरी, माने, कासीम, कुळकर्णी, वानखेडे, देशमुख, रामेश्वर वेंजाने, किरण जगताप, तहसीलदार इंगळे, ठाणेदार माळवे, विराणी, सोळंकी, इखार व स्काऊट गाईड व एनसीसीचे पथक उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रतिकृती सादर केल्या.Gurukul School यामध्ये रॉकेट लाँचर, चांद्रयान 3 लँडर, पोस्टर प्रदर्शनी, राखी प्रदर्शनी, पालकांकरीता व विद्यार्थ्यांकरीता सेल्फी पॉईंटसुद्धा बनवण्यात आले होते. याप्रसंगी गुरुकुल शाळेत समारोपीय कार्यक्रमाकरीता पांढरकवडा शहरातील व तालुक्यातील 25 शाळांनी आपल्या 2 हजार 200 विद्यार्थ्यांसह तर 900 पालकांनी व विज्ञान प्रेमी मंडळींनी वैयक्तीकरित्या भेट देऊन आपला सहभाग नोंदविला. शाळेच्या या अनोख्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शाळेचे आभार मानले. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धाचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली.या प्रसंगी मंचावर विज्ञान भारतीचे नरेश चाफेकर, गिरीश जोशी शाळेचे अध्यक्ष डॉ. अभिनय नहाते, सचिव नरेंद्र नार्लावार, प्रा. डॉ. प्रदीप झीलपीलवार, रवी नस्कुलवार, शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी, विनोज उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0