अकोला,
Akola Taluka Sports Complex : देशी आणि स्थानिक पारंपरिक क्रीडा संस्कृतीचे जतन करून या परंपरेचा वारसा चालविण्यासोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता या स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी अकोला तालुक्यातील गुडधी,अदलाबाद, घुसर मार्गावर अलियाबाद गावाजवळ अकोला तालुका क्रीडा संकूल उभे राहणार असून यासाठी शासनाने पाच कोटी रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या संदर्भात काम सुरू होणार आहे. आ.रणधीर सावरकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. क्रीडाक्षेत्राच्या सक्षमीकरणाची गरज लक्षात घेत अकोला तालुक्यासाठी भव्य आणि आधुनिक क्रीडा संकुल असावे याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी सतत प्रयत्न केले. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने येथे 14 एकर जमिनीवर हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.
स्थानिक खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना आगामी काळातील Akola Taluka Sports Complex आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी करावयाची तयारी म्हणून क्रीडा विषयक पायाभूत सुविधांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू घडविणे तसेच अत्याधुनिक प्रशिक्षणाकरता आर्थिक सहाय्य, खेळाडूंना प्रोत्साहन, सवलती व गौरव, क्रीडा वातावरण निर्मिती, क्रीडा महोत्सवांचे आयोजन, तांत्रिक मनुष्यबळ विकास सोबतच साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देण्यासाठी या तालुका क्रीडा संकुलात 400 मीटरचा रनिग ट्रॅक, अद्यावत बॅडमिंटन हॉल, प्रशासकीय इमारत, विविध खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था व इलेक्ट्रीक व्यवस्था इ.सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.
1 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर
अकोला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेटला जोडणार्या Akola Taluka Sports Complex दयनीय मार्गाच्या नूतनीकरणासाठी आ. रणधीर सावरकर यांनी आवश्यक तो पाठपुरावा करून 1 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून आणला आहे.त्यामुळे भाविकांना आणि नागरिकांना सुविधा मिळणार आहेत. अकोला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र म्हणून पानेटची ओळख आहे. येथे भुयारात असलेले पुरातन कालीन शिवलिंग व ब्रम्हचारी महाराजांचे समाधी स्थळ असल्याने या स्थळाला अधिक महत्व आहे. याठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. परंतु येथे ये-जा करण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने भाविकांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पानेट संस्थानला जोडणार्या या मार्गासाठी आवश्यक निधी मंजूर करावा याबाबत आमदार रणधीर सावरकर यांच्या कडे मागणी करण्यात आली होती.त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला व ही मागणी रेटून धरली.आता शासनाने या मार्गाच्या कामासाठी 1 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
तीर्थक्षेत्र पानेट हे आपल्या जिल्ह्यातील अतिशय प्राचीन धार्मिक स्थळ आहे. Akola Taluka Sports Complex याठिकाणी असंख्य भाविकांची वर्दळ असते. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देता याव्या हाच प्रामाणिक प्रयत्न आहे, आमदार रणधीर सावरकर म्हणाले. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तीर्थक्षेत्राचे आमदार सावरकर यांनी पालकत्व स्वीकारल्या पासून अंदाजे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध होत असल्याने भाविकांमधे आनंदाचे वातावरण आहे, असे तीर्थक्षेत्र पानेटचे अध्यक्ष मनीष मोडक यांनी सांगितले.