ऋषिपंचमी निमित्त गजानन विजय ग्रंथाचे सामुहीक पारायण

18 Sep 2023 16:03:37
वाशीम,
Gajanan Vijay Granth श्री संत गजानन महाराज पुण्तिथी ऋषिपंचमी निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर, आय. यु. डी. पी. कॉलनी, वाशीम येथे १८ ते २० सप्टेंबर पर्यंत सकाळी ८ ते ११ या वेळेत हभप श्रीकृष्ण पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री समर्थ गजानन विजय ग्रंथाचे सामुहीक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
Gajanan Vijay Granth
 
तसेच २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १ पर्यंत हभप जय महाराज सरनाईक देऊळगावकर यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत भव्य महाप्रसाद व रात्री ८ ते १० पर्यंत भजन संध्या अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भक्तांनी सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. Gajanan Vijay Granth असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समिती, वाशिम यांच्या वतीनी करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0