बुलढाणा,
निर्सगरम्य वातावरणात वसलेल्या बुलडाणा शहरातील Sahakar Vidya Mandir सहकार विद्या मंदिरने आपल्या शैक्षणिक यशाचा झेंडा महाराष्ट्रासह देशातच नव्हे तर विदेशातदेखील रोवला आहे. सहकार विद्या मंदिरला नुकताच इंटरनॅशनल ग्रीन स्कुल पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अत्यंत प्रतिष्ठित व मान्यताप्राप्त संस्था ग्रीन मेंटार तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रत्येक मुलासाठी ग्रीन स्कूल या थीम अंतर्गत ही परीषद आशेचा किरण, कल्पनांचा एक महत्वाचा भाग आणि सुसंवादी भविष्यासाठी सामाजिक वचनबद्धतेचा उत्सव म्हणून ही संस्था काम करते.
भविष्यासाठी ग्रीनिंग एज्युकेशन हे शिक्षणाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण पर्यावरणीय चेतना, Sahakar Vidya Mandir नाविन्य आणि नैतिकता कशी अंतर्भुत करु शकतो हे शोधण्यासाठी हे संस्था एकप्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत असते. या परिषदेत हरित नायक केवळ हरित शिक्षण भागीदारी साजरे करण्यासाठी एकत्र येत नाहीत तर हरित मुत्सद्देगिरीचे चॅम्पियन, आपल्या ग्रहाचे कारभारी, भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उदाहरणे देऊन नेतृत्व करणारी विद्यापीठे, शाळा यांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येत असतात. सहकार विद्या मंदिरमध्ये विद्याथ्र्यांना केवळ शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष न देता त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येते. असा हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मनोज गांधी यांनी सहकार विद्या मंदिरच्या वतीने (न्युयॉर्क) अमेरिका येथे स्विकारला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले की, Sahakar Vidya Mandir हा पुरस्कार म्हणजे आपल्या अविरित कार्याचा, मेहनतीचा सन्मान असुन प्रत्येक बुलडाणेकरासाठी अभिमानास्पद आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी हा आपल्या आयुष्यातील गौरवास्पद व अविस्मरणीय पुरस्कार असुन आज सहकार विद्या मंदिरच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात येत आहे. असे मत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.