नागपूर,
pola at nagpur प्रतिभा बहुउद्देशीय संस्था व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन यांच्या वतीने भव्य तान्हा पोळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भगवान गोपालकृष्ण व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. pola at nagpur यात १५० स्पर्धकानी भाग घेतला. वेशभूषा व बैलाची सजावट यात प्रथम पुरस्कार सायकल, व्ही एन रेड्डी यांच्यातर्फे व अन्य सर्व पुरस्कार विवेक मेढ़ी व संस्थेच्या वतीने देण्यात आले. pola at nagpur दूसरा स्टडी टेबल, तिसरा क्रिकेट बॅट, बास्केट बॉल रिंग, बॅडमिंटन रॉकेट्स १५ मुख्य पुरस्कार व २५ उत्तेजनार्थ पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले.
![pola at nagpur pola at nagpur](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/9/18/pratibha-nagpur-f_202309181835364027_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
उर्वरित स्पर्धकाना पेन पाऊच देण्यात आले. pola at nagpur परीक्षक भारती हांडा, शतनु येरपुडे, डॉ. सतीश देशमुख यांनी बैलांचे निरीक्षण केले. संदेश व सर्व गोष्टीचा विचार करुन पुरस्कार देण्यात आले. प्रथम पुरस्कार सायकल, मिधांश लेकुरवाळे, द्वितीय मिहिर आणि ऋग्वेद बांते,तृतीय पुरस्कार शुक्रा पहाडेला देण्यात आला. pola at nagpur कार्यक्रमात प्रमुख अतिथि भाजप दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे, प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश काळे, कामगार यूनियनचे शंकर पहाडे , माजी नगरसेवक प्रमोद तभाने, माजी नगरसेवक विवेक तरासे,मानवाधिकार संगठन राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही.एन.रेड्डी, डॉ सतीश देशमुख व मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते. pola at nagpur
सौजन्य : शंकर पहाडे, संपर्क मित्र