‘मेरी मांटी मेरा देश’ अभियान

    दिनांक :19-Sep-2023
Total Views |
- आ. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती

बाभुळगाव, 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त राबविण्यात येत असलेल्या टप्पा दोनचा गावस्तरीय शुभारंभ बाभुळगाव येथे आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाला. अभियानाच्या या टप्प्यात गावस्तरावर मातीचे संकलन करून त्याचे कलश तालुकास्तरावर पोचविले जाणार आहेत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी मांटी मेरा देश’ अभियानाचा दुसरा टप्पा 1 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने गावस्तरावर राबविण्यात येणार्‍या उपक‘मांचा शुभारंभ Ashok Uike आ. डॉ. उईके यांच्या हस्ते झाला.
 
 
Abhiyan ds
 
बाभुळगाव पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पुडके, कृषी अधिकारी चव्हाण, पंसल पंचायत, आरोग्य, कृषी, शिक्षण या विभागांचे सर्व विस्तार अधिकारी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. अभियानांतर्गत गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या उपक्रमांचा Ashok Uike आ. डॉ. उईके यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. ‘आयुष्यमान भारत’ योजनेबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमावेळी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
यावेळी तहसीलदार मीरा पागोरे व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी मार्गदर्शन केले व पंचप्रण शपथ सर्वांनी घेतली. कार्यक्रमाचे संचालन पंचायतचे विस्तार अधिकारी पोपळकर यांनी केले. अभियानांतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत गावोगावी अमृतकलश यात्रा काढली जात असून प्रत्येक घरातून माती गोळा केली जाणार आहे. या मातीचा कलश तालुका व तेथून जिल्हास्तरावर पोहोचविला जाणार, असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.