विद्यार्थीनींद्वारे पौष्टिक व रुचकर आहाराची मेजवाणी

19 Sep 2023 18:54:41
गडचिरोली, 
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित Women's College महिला महाविद्यालय गडचिरोली येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित नवोप्रकांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी अनेक पौष्टिक व रुचकर आहाराची मेजवानी सादर केली. गृहअर्थशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. योगेश के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात सदर नवोपक्रम राबविण्यात आला.
 
Women's College
 
यावेळी प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी उच्च शिक्षणासोबतच उत्तम आरोग्य व निरोगी राहण्यासाठी नियमित सवय व प्रथीने युक्त आहारची गरज असते. जीवनसत्त्वांनी समृद्ध असणारे पदार्थ मानवी आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असते. कडधान्याचे मानवी आहारात विशेष महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रा. खेवले, प्रा. पुल्लकवार, डॉ. मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पूर्णिमा मेश्राम यांनी मानवी जीवनासाठी आवश्यक खाद्यपदार्थ, त्याचे प्रमाण, खाद्य पदार्थातील प्रोटीनचे प्रमाण, Women's College महिला आरोग्याच्या दृष्टीने त्यांची गरज, योग्य व अयोग्य परिणाम याविषयी चर्चा केली.
 
 
यावेळी Women's College विद्यार्थिनींनी विविध प्रकाराच्या पौष्टिक पदार्थ, आहाराची मेजवाणी सादर केले. यासोबतच कडधान्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तयार केल्या तसेच नव्या प्रकारच्या प्रतिकृती तयार करून त्याचे उपयोग सांगितले. यानंतर विविध पाककृतीच्या प्रदर्शनी आयोजित केली होती. याचे परीक्षण प्रा. पी. त्रिपाठी, प्रा. एस. एम. गहेरवार, डॉ. राऊत यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गृह अर्थशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0