तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Shri Ganpati coin : ‘श्रीगणपती’ हे मराठा साम्राज्यातील अत्यंत महत्वाचे चांदीचे नाणे आहे. 1759 ते 1806 हा मोगल बादशहा शाह आलम (व्दितीय) यांचा कार्यकाळ होय. त्यावेळी मिरज संस्थानाचे पटवर्धन हे मराठी शासक होते. त्यांचे आराध्य दैवत गणपती होते. त्यांनीच या चांदीच्या ‘श्रीगणपती’ नाण्याची निर्मिती केली. या नाण्याच्या समोरील बाजूस श्रीगणपती आणि बाजूस शाह आलम बादशाह गाजी आणि हिजरी वर्ष 1202 अंकित आहे. पेशव्यांना मान देण्यासाठी ‘पंतप्रधान’ असे नमूद आहे, अशी माहिती पुरातन नाणेतज्ज्ञ अशोकसिंग ठाकूर यांनी तभाला दिली.
या Shri Ganpati coin नाण्यावर मागच्या बाजूस ‘श्री पंतप्रधान’ आणि फारशीमध्ये ‘मैमनत मानुस’ आणि टांकसाळीचे नाव मुर्तजाबाद (मिरज) असे अंकित केले गेले आहे. 11.34 ग्रॅम वजनाचे हे नाणे मिरज संस्थानच्या पटवर्धन यांनी पेशवे यांच्याविषयी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी घडविले होते. ‘पंतप्रधान’ ही पेशवे यांची पदवी आहे. त्याकाळी संस्थानिक कोणीही असो दिल्लीत ज्याचे शासन, त्याच्या नावानेच नाणे काढण्याची पद्धती होती, असेही अशोकसिंग ठाकूर यांनी सांगितले.