नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर Shaktikanta Das शक्तिकांत दास जगातील बँकर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्स या मासिकाने त्यांना जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स अहवालात शक्तिकांत दास यांना ए प्लस मानांकन दिले आहे.
दास यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे थॉमस जे. जॉर्डन दुसर्या तर व्हिएतनामचे गुयेन थी हांग तिसर्या स्थानावर आहेत. यात मानांकन ठरवण्याचे प्रमाण वेगळे असते. अमेरिकेच्या नियतकालिकाने एका प्रकाशनात म्हटले आहे की उत्कृष्ट कामगिरीसाठी ए श्रेणी दिली जाते, तर अपयशासाठी एफ दिला जातो. महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनाच्या आधारे एफ मानांकन दिले जाते. दास यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Shaktikanta Das शक्तिकांत दास यांचे अभिनंदन केलेे. ते म्हणाले की, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाला बळकट करीत राहील.