आता इस्रो पाठवणार ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह

02 Sep 2023 20:45:24
- खगोलशास्त्र विज्ञानाचा रहस्य उलगडणार
 
बंगळुरू, 
काही दिवसांपूर्वी चांद्रयान-3 आणि आज आदित्य एल-1 च्या यशानंतर इस्रोचे मनोबल उंचावले आहे. पुढील वर्षी गगनयान आणि त्याहीपुढे अनेक मोहिमा आखून यशस्वी करण्याच्या विचारात इस्रो आहे. दहा दिवसांत दोन यशस्वी मोहिमानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मनात आहे तरी काय, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. पुढच्या वर्षीच्या गगनयान मोहिमेपूर्वी इस्रो आणखी एका मोहिमेची तयारी करीत आहे. भारत लवकरच X-ray Polarimeter Satellite  ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह’ लाँच करण्याच्या तयारीत आहे.
 
 
X-ray Polarimeter Satellite
 
एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाद्वारे खगोलशास्त्रातील अत्याधुनिक वैज्ञानिक समज वाढवण्याच्या उद्देशाने इस्रो एक मोहीम आखत आहे. चमकदार खगोलीय क्ष-किरण स्रोतांच्या विविध गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी ही भारताची पहिली समर्पित ध्रुवीय मोहीम आहे. X-ray Polarimeter Satellite एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपणासाठी तयार आहे, असे इस्रोच्या अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले. 
 
 
कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, पल्सर विंड नेब्युला यासारख्या विविध खगोलीय स्रोतांमधून उत्सर्जनाची यंत्रणा जटिल भौतिक प्रक्रियांमधून उद्भवते. इस्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, विविध अवकाश-आधारित वेधशाळांनी स्पेक्ट्रोस्कोपिक आणि वेळेची माहिती मुबलक प्रमाणात प्रदान केली आहे; परंतु अशा स्रोतांमधून उत्सर्जनाचे नेमके स्वरूप अद्याप खगोलशास्त्रज्ञांसमोर गंभीर आव्हाने आहेत. हे प्राथमिक पेलोड पोलिक्स (क्ष-किरणांमधील पोलरीमेट्री साधन) मध्यम क्ष-किरण ऊर्जा श्रेणीतील खगोलीय उत्पत्तीच्या 8-30 केव्ही फोटॉनचे ध्रुवीय मापदंड (ध्रुवीकरणाचा अंश आणि कोन) मोजेल. इस्रोच्या मते, X-ray Polarimeter Satellite एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि टाइमिंग पेलोड 0.8-15 केव्ही ऊर्जा श्रेणीमध्ये स्पेक्ट्रोस्कोपिक माहिती प्रदान करेल.
Powered By Sangraha 9.0