हाता शेतजमीन लिलावाच्या प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप

21 Sep 2023 16:19:59
अकोला,
Hata agricultural land जिल्ह्यातील हाता येथील शेतजमिनीचा लिलाव वहिती करण्यासाठी करण्यात येत आहे.पण लिलावाच्या या प्रक्रियेवर जि.प.तील विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला असून बुधवार 20 सप्टेंबर रोजी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.जि.प.च्या आजच्या सभेत लिलाव प्रक्रियेच्या मुद्यावर आक्षेप घेत अत्यंत वादळी चर्चा करण्यात आली व नेहमी प्रमाणे गोंधळातच ही सभा पार पडली. विविध विषयांवर चर्चा केली जात असतानाच जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग (रस्ते) कामांची मंजूर यादी इतिवृत्तासोबत का देण्यात आली नाही असा प्रश्न विरोधातील उबाठा गटाचे सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, गटनेता गोपाल दातकर यांनी केला. मंजूर करण्यात आलेल्या संबंधित रस्ते कामांची यादी इतिवृत्तासोबत दिली नाही त्यामुळे मागील सभेत इतिवृत्त मंजूर कसे करणार, असा प्रश्न गजानन पुंडकर यांनी केला.
 
 
fdgr565
 
हाता येथील जिल्हा परिषदेची शेतजमीन वहितीसाठी देण्यात येत असून त्साठी राबविलेल्या लिलावात जि.प.ला फारच कमी दर मिळाल्याने त्यावरच विरोधी सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. हाता प्रकरणी लिलाव प्रक्रिया राबविण्याचे अधिकार जि.प. अध्यक्षांना देण्यात आले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न उबाठाचे गटनेता गोपाल दातकर यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी यावर त्यांची भूमिका मांडली.पण त्यावर दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर यांनी आक्षेप घेतला व यासंदर्भात अध्यक्षांनीच उत्तर दिले पाहिजे अशी मागणी केली. Hata agricultural land त्यांनी ही मागणी लावून धरल्याने सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये वादंग माजला आणि सभेत गोंधळ उडाला. या सभेत जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ , उपाध्यक्ष सुनील फाटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0