मुंबई आयआयएमच्या निमित्ताने...

IIM Mumbai-NITIE एक्झिक्युटिव्ह एमबीएसाठी मुंबई सर्वोत्तम

    दिनांक :22-Sep-2023
Total Views |
दृष्टिक्षेप
 
- डॉ. उदय निरगुडकर
IIM Mumbai-NITIE मुंबई हे रुखवत किंवा हुंड्यात मिळालेले शहर, दलदलींचे आणि सात बेटांचे; पण हा झाला इतिहास. आज मुंबई हे भारतातले किंवा आशियातले नव्हे तर संपूर्ण जगातले एक महत्त्वाचे शहर आहे. व्यापार, उद्योगाचे केंद्र आहे. या शहरात टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा अनेक मोठ्या उद्योगांची मुख्य कार्यालये आहेत. IIM Mumbai-NITIE अनेक देशी-विदेशी बँकांची प्रमुख कार्यालये आहेत. केईएम, जेजे अशी उत्तम सरकारी तर लीलावती, हिंदुजा अशी अव्याढव्य खाजगी रुग्णालये या शहरात आहेत. ‘सीप्झ'मध्ये जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. बस आणि उपनगरी रेल्वेचे स्वस्त आणि मस्त असे जाळे आहे. त्यात भर पडत आहे ती वेगाने विस्तारणाऱ्या मेट्रोची. IIM Mumbai-NITIE या देशातील सर्वात जुनी महानगरपालिका, समुद्र या सगळ्यांमुळे हे शहर करमणूक, व्यवसाय आणि उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथल्या शेअर मार्केटमुळे धनाढ्यांची वस्ती वाढत जात आहे. वेळेच्या फरकामुळे मुंबई योग्य ठिकाणी आहे. म्हणजे दक्षिण पूर्व आशियाच्या चार तास मागे आणि युरोपियन युनियनच्या आठ तास पुढे. या शहरात अनेक उत्तम संशोधन आणि शिक्षण संस्था आहेत. IIM Mumbai-NITIE इथे व्यवस्थापन, महाविद्यालये आहेत. जमनालाल बजाज, झेव्हियर्स, भवन्स, नरसी मोनजीसारख्या शिक्षण संस्था आहेत. इथे मिळणारे दर्जेदार व्यवस्थापन शिक्षण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतात. पण या शहरात सर्वोत्तम व्यवस्थापन शिक्षण देणारे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नाही. सरकारने अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयाने हे चित्र बदलले आहे.IIM Mumbai-NITIE
 
 
 
IIM Mumbai-NITIE
 
 
‘निटी' या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या प्रख्यात संस्थेचे आता आयआयएममध्ये रूपांतर केले जाणार आहे. IIM Mumbai-NITIE त्याची दर्जावृद्धी होणार आहे. निटी हा शैक्षणिक क्षेत्रातला एक उत्तम ब्रँड होता. आता त्यांना आयआयएम हा सरस ब्रँड मिळणार आहे. वर वर पाहता ही तशी दुर्लक्षित संस्था. पण आयआयएमचा शिक्का मिळाल्यामुळे या संस्थेचा कायापालट होणार आहे, हे निश्चित. आजपर्यंत इंजिनीअरिंग नंतर व्यवस्थापन शिक्षण देण्यासाठी निटी प्रसिद्ध होती. आता त्यात आर्टस, कॉमर्स, व्ह्युमॅनिटी अशा अनेक शैक्षणिक विविधता असलेल्या विद्याथ्र्यांनादेखील व्यवस्थापन शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. अर्थातच या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. IIM Mumbai-NITIE हा निर्णय जाहीर झाल्यावर इथल्या विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष हे त्याचे निदर्शक ठरले. देशाचे बाविसावे आणि मुंंबईतले पहिले आयआयएम आता अस्तित्वात येत आहे. गेली अनेक वर्षे याची मागणी होत होती. ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे इंदूरनंतर आयआयटी आणि आयआयएम अशा प्रकारच्या दोन्ही संस्था असणारे मुंबई हे दुसरे शहर बनले आहे. आयआयएममध्ये अ‍ॅडमिशन मिळविण्यासाठी कॉमन एंट्रन्स टेस्टला लाखो विद्यार्थी बसतात. त्यांना पुढील वर्षापासून ५०० हून अधिक जागा उपलब्ध होणार आहेत.
 
 
IIM Mumbai-NITIE ६० वर्षांची देदीप्यमान परंपरा असणाऱ्या निटीला आयआयएमच्या ब्रँडच्या कुबड्या घेण्याची गरजच काय होती, असा प्रश्न पडू शकतो. पहिली गोष्ट आयआयएमचा ब्रँड मिळाल्यामुळे विविध प्रकारांचे गुणवंत विद्यार्थी मिळणे सोपे होणार आहे. लक्षात घ्या, यावर्षी आयआयएम अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मिळालेल्या नोकऱ्यांसाठी सरासरी ७० लाख रुपये वार्षिक पगार देण्यात आला. त्यामुळे निटीसाठी दर्जा, गुणवत्तावाढ महत्त्वाचे आहेच. अर्थातच हा प्रवास सोपा नाही. पण नावात काय आहे याचं उत्तर वरील उदाहरणातून मिळते. खरे तर या धडपडीची सुरुवात १५ वर्षांपूर्वी सुरू झाली. अफाट मेहनत आणि सातत्याने केलेला पाठपुरावा याचे फलित म्हणून १७ मंत्रालयांनी या संदर्भातील फाईलवर सकारात्मक शेरा लिहिला गेला तेव्हा कुठे राष्ट्रपतींनी आयआयएमचा शिक्का मारायला सही केली. IIM Mumbai-NITIEएका चालू असलेल्या संस्थेला आयआयएममध्ये परिवर्तित करणे हे नव्याने उभारल्या जाणाऱ्या आयआयएमपेक्षा कठीण असते. त्यात मुंबई ही भारताची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी. यानंतर ती व्यवस्थापन शिक्षणाची राजधानी म्हणून ओळखली जाण्याची संधी निर्माण झाली असून त्यासाठी पवई येथील निटीचा ६५ एकरांचा परिसर आता एका आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राच्या स्वरूपात बदलला जाणार आहे.
 
 
त्यामुळे केलेली निटीची निवड योग्य होती. IIM Mumbai-NITIE त्याबद्दल केंद्र सरकारचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच ! निटी ही संस्था आणि त्याचा परिसर ही राष्ट्रीय संपत्ती होती आणि त्याचा उपयोग आता अधिक मोठ्या स्तरावर केला जात आहे. अर्थातच अशा प्रकारचा बदल सोपा नसतो. यासाठी संचालक मंडळात खूप मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागले. विद्यार्थ्यांना राहण्याच्या उत्तम सोयी, उत्तम दर्जाचे शिक्षण, उत्तम लायब्ररी, उत्तम प्रोजेक्ट हे सर्व ओघानेच येणार आहे. इतकी वर्षे या जागा रिक्त होत्या. त्या आता वेगाने भरल्या जात आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे प्रमाण यामुळे अधिक सक्षम होत आहे. IIM Mumbai-NITIE सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप अत्यल्प आहे. त्यामुळे संस्था तंदुरुस्त आणि आकर्षक बनत आहे. देणगी देणाऱ्यांसाठी संस्थेची ही स्वायत्तता फार महत्त्वाची असते. त्यामुळे हा बदल स्पृहणीय म्हणायला हवा. या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अत्यंत वेगाने पावले उचलली. विविध प्रकारांच्या समित्या स्थापन केल्या आणि निटीचा आयआयएमपर्यंतचा प्रवास सुलभ केला. IIM Mumbai-NITIE यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा पुरेपूर सन्मान राखला गेला.
 
 
अनेक अभ्यास गट आणि त्यांचे अहवाल सादर केले गेले आणि मग दर्जा उत्तम राहील याची खात्री पटल्यावर ‘निटी'चे नवे बारसे होऊन ‘आयआयएम, मुंबई' हे नाव प्रदान करण्यात आले. निटी आतापर्यंत प्रतिष्ठित होती. आयआयएममुळे त्यांना जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम राबविण्याची संधी मिळत आहे. IIM Mumbai-NITIE मुंबई हे औद्योगिक शहर असल्यामुळे इथे प्रत्येक कार्यानुभव असणारे शिक्षक मिळणे सोपे जाणार असून मोठ्या कंपन्यांना कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी बोलावणे सोयीचे होणार आहे. अनेक उद्योग समूहांबरोबर सहकार्य प्रकल्प राबविता येतील तर उद्योग समूहातील दिग्गजांची मेंटॉरिंग फॅसिलिटी सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे एक प्रकारची गुणवत्ताप्रधान शिक्षण देणारी व्यवस्थाच निर्माण होत आहे. पुढे या शैक्षणिक केंद्राचे माजी विद्यार्थी उच्च पदावर जातील. त्यांच्या नेटवर्किंगचा, अनुभवाचा आणि आर्थिक दबदब्याचा फायदा अनेक प्रकारांनी मिळविला जाऊ शकतो. त्यामुळे निधी आणि शिक्षक यांचा तुटवडा कधीच भासू नये. IIM Mumbai-NITIE खरे म्हणजे पहिले आयआयएम मुंबईतच निघणार होते, पण मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी त्याला खोडा घातला आणि आमच्या संस्थांबरोबर याची स्पर्धा होईल, असे कारण देत सहयोग न करण्याची भूमिका घेतली. पुढे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना नव्वदीच्या दशकात ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस'देखील मुंबईतच होणार होते.
 
 
IIM Mumbai-NITIE पण तिथे भूमिपुत्रांना राखीव जागा हव्यात, अशी हास्यास्पद भूमिका शिवसेनेने घेतली आणि संधीचा फायदा उठवत चंद्राबाबू नायडूंनी आयएसबी हैदराबादला नेले. गंमत म्हणजे तिथले पहिले काही संचालक मराठी होते. मुंबईने आयआयएम गमावल्यावर विक्रम साराभाई आणि कस्तुरभाई लालभाई या दोन द्रष्ट्या उद्योजकांनी आयआयएम अहमदाबादची पायाभरणी केली. पुढे १९६१ मध्ये दुसरे आयआयएम कोलकात्यामध्ये निघाले. दरम्यान, मुंबईत १९६३ मध्ये निटीची स्थापना झाली. ती देखील आयएलओसारख्या जागतिक संघटनेच्या मदतीने. IIM Mumbai-NITIE आज आनंद महिंद्रासारख्या प्रख्यात उद्योगपतींनीदेखील निटीचे रूपांतर आयआयएममध्ये व्हावे यासाठी कंबर कसली होती. याचे मूळ कारण म्हणजे निटीला डिग्री देण्याचा अधिकार नव्हता आणि दुर्दैवाने अनेक उद्योग आणि पालकांच्या मनात डिप्लोमाविषयी दुय्यम भावना होती. आता हा अडसर दूर झाला आणि विविध प्रकारांचे शैक्षणिक अभ्यासक्रम आता आयआयएम, मुंबई येथे राबविण्यात येतील. तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याची सांगड तिकडे होतीच; आता त्यात भर बहुविध शाखांची पडणार आहे.IIM Mumbai-NITIE
 
 
एक्झिक्युटिव्ह एमबीएसाठी मुंबई ही सर्वोत्तम जागा आहे. एखाद्या इंडस्ट्रीसाठी त्यांना अनुकुल ठरतील, असे अभ्यासक्रम राबवायला मुंबई सोन्याची खाण आहे. जाहिरात, फार्मा, ट्रान्सपोर्ट असे अनेक अभ्यासक्रम सुरू होतील. इतकेच काय, शेअर बाजाराला वाहिलेले अभ्यासक्रमदेखील इथे सुरू होतील. अनेक परदेशी शिक्षक इथे शिकवायला येतील. अर्थातच अशा बदलामध्ये सांस्कृतिक प्रश्न महत्त्वाचे असतात. याचे कारण प्रत्येक संस्थेची एक कार्यसंस्कृती असते. निटी ही आजपर्यंत ऑपरेशन्स मॅनेजमेंट शिकणा-यांसाठी काशी समजली जात होती. IIM Mumbai-NITIE आता मात्र हे चित्र अधिक विस्तारित होत जाणार आहे. देशात नागरीकरणाचा वेग अफलातून आहे. पण, आर्थिक विषमतेची दरीही वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखत विकास हे आज मोठे आव्हान आहे. यापुढील दोन शतकांमध्ये ग्राहकांच्या मागण्या बदलत जातील आणि भारतीय बाजारपेठेचा वेगाने विस्तार होईल. या सगळ्याला हातभार लावणारे द्रष्टे व्यवस्थापक इथे निर्माण व्हावेत, या शुभेच्छा...