अमृत कलशासाठी माजी आ. पुराम यांनी गोळा केली माती

23 Sep 2023 19:19:46
आमगाव,
Amrit Kalash : भाजपा आमगाव मंडळाच्या वतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत माजी आमदार संजय पुराम यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रातील गावोगावी यात्रा काढून दिल्ली येथे शूरवीरांच्या स्मरणार्थ तयार होणार्‍या अशोक वाटिकेकरिता माती गोळा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविले जात असून गावागावातील माती गोळा करून दिल्लीत तयार होणार्‍या अशोक वाटिकेत पाठविली जाणार आहे.
 
Amrit Kalash
 
याअंतर्गत माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील घाटटेमणी येथून Amrit Kalash कलश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पुराम यांनी घरोघरी जाऊन माती संकलन केले व पंचप्रण प्रतिज्ञा दिली. या यात्रेत ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही यात्रा घाटटेमणी, कंरजी, भोसा, गिरोला, टाकरी, कातुर्ली, कालीमाती, मुंडीपार, मरारटोला, सरकारटोला, शंभुटोला, नंगपुरा, कटीपार, किकरीपार, चिरचाळबांध, सितेपार, खुर्शिपार, दहेगाव, मानेगाव, ठाणा, गोरठा, बोथली, सुरकुडा, आसोली, तिगाव, फुक्कीमेटा, कवडी, अंजोरा, बाम्हणी, पद्मपूर, माल्ही, आमगाव, बनगाव, किडंगीपार, रिसामा, बिरसी आदी गावांमध्ये काढून माती संकलन व पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी पुराम यांनी ग्रामस्थांना अभियानाचे महत्त्व पटवून दिले. यात्रेत माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी जिप अध्यक्ष विजय शिवनकर, जिप सदस्य हनवत वट्टी, किशोर महारवाडे, जिप बालकल्याण सभापती सविता पुराम, राजेंद्र गौतम, नोहरलाल चौधरी, अ‍ॅड. सेवक बागडे, श्रीकांत राणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र पटले, माजी अध्यक्ष काशीराम हुकरे, नरेंद्र वाजपेयी, राकेश शेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0