मध्यप्रदेशात ‘वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प’

    दिनांक :23-Sep-2023
Total Views |
- राज्यात वाघांसाठी सातवा अधिवास
 
भोपाळ, 
देशातील सर्वाधिक वाघ असलेल्या मध्यप्रदेशला Durgavati Tiger Reserve ‘वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प’ नावाचे वाघांसाठी नवीन संरक्षित क्षेत्र मिळाले आहे. हा राज्यातील सातवा व्याघ‘ प्रकल्प आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले. 2022 च्या व्याघ‘गणनेत मध्यप्रदेशने ‘वाघांचे राज्य’चा दर्जा कायम ठेवला. राज्यातील वाघांची संख्या 2018 मध्ये 526 होती. ती आता 785 पर्यंत पोहोचली आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध क्षेत्रांना अधिसूचित केले आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच, पन्ना आणि संजय-दुबरी हे सहा व्याघ्र प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये आहेत.
 
 
Durgavati Tiger Reserve
 
केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देताना केंद्राने सांगितलेल्या अटींचे पालन करून सागर, दमोह आणि नरसिंगपूर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या नवीन व्याघ‘ प्रकल्पाला अधिसूचित करण्यात आले आहे. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशातील सातवा व्याघ‘ प्रकल्प ठरला आहे. अधिकार्‍याने सांगितले की, पूर्वी अधिसूचित नौरादेही आणि Durgavati Tiger Reserve वीरांगना दुर्गावती अभयारण्यांमधील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रे आणि आसपासच्या वनक्षेत्रांचा अधिसूचित बफर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 
 
Durgavati Tiger Reserve या व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोणतेही नवीन महसुली क्षेत्र समाविष्ट करण्यात आलेले नसल्यामुळे आजूबाजूला राहणार्‍या स्थानिक लोकांवर कोणतेही अतिरिक्त निर्बंध लादले जाणार नाहीत. या व्याघ‘ प्रकल्पासह हे क्षेत्र आधीच अभयारण्य किंवा पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने या वर्षी जुलैमध्ये जारी केलेल्या ‘स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया : को-प्रेडेटर्स अ‍ॅण्ड प्रेय-2022’ या अहवालानुसार, मध्यप्रदेशात (785) देशात वाघांची सर्वाधिक संख्या आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (563) आणि उत्तराखंड (560) यांचा क‘मांक लागतो.