तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Lord Ganapati : यवतमाळ नगरीतील नवसाला पावणार्या, उजव्या सोंडेच्या जिनातील श्री गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. 1902 साली स्थापन झालेल्या या मंदिरास 121 वर्ष पूर्ण झाली आहेत. या मंदिरास लोकमान्य टिळक, शंकराचार्य (करवीर पीठ), पं. हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर, राजेश्वर माऊली, शंकर महाराज या मान्यवरांनी भेट दिलेली आहे. गणेशोत्सवानिमित्त्य 17 सप्टेंबरला मंदिरात नियमित येणार्या भक्तांची सेवा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पुढीलप्रमाणे सदस्य आहेत.
डॉ. उदय नावलेकर, प्रमोद देशपांडे, कृष्णा गोखले, संजय चिद्दरवार, किशोर रुंगठा, अपराजिता चोखाणी, प्रवीण निमोदिया, नितीन जोशी, किशोर पालतेवार, किरण बडे, नीता बोबडे, गोविंद मोर, चंचल झंवर, भूषण कुटे, राजेश गोफणे, अनिल चूरा, सुनील गुंजाळ, अभिषेक जाजू, चंद्रकांत वाळके, राजू गुल्हाने, विशाल जाजू, अभय चोपडे, नरेंद्र आदमने, दिनेश हिरेमठ, भालचंद्र रानडे, मनीषा बनसोड, मिलिंद वेळकर इत्यादी.
पुढील वर्षात मंदिरातील सोयी सुविधांमध्ये वाढ करणे, Lord Ganapati मंदिराला अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करणे नावीन्यपूर्ण उपक‘म राबविण्यासाठी ही सेवा समिती कार्यप्रवण राहणार आहे. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व यवतमाळकर नागरिक भक्तांनी मंदिरास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन श्री गणपती मंदिर सेवा समितीद्वारे करण्यात आले आहे.