‘जंगली’तील ‘याऽऽऽहू’चा आवाज हरपला

24 Sep 2023 21:51:34
मुंबई, 
Director Prayag Raj : प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रयाग राज यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट लिहिणारे प्रयाग राज यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. प्रयाग राज यांची ‘याहू’ अशा नावानेही ओळख होती. त्यांनी 60च्या दशकात ‘जंगली’ सिनेमातील गाण्याला आवाज दिला होता आणि ‘याहू’ शब्द अतिशय प्रसिद्ध झाला होता.
 
Director Prayag Raj
 
त्यांच्यावर रविवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. (Director Prayag Raj) प्रयाग राज यांनी सिनेमात केवळ लेखनाचे काम केले नाही, तर ते अभिनयदेखील करीत होते. ते दिग्दर्शक होते. त्यांनी बिग बींपासून ते रजनीकांत यासार‘या सुपरस्टारसोबत काम केले आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये लेखन आणि दिग्दर्शनाशिवाय त्यांनी काही गाणी लिहिली. गाण्यांना चाली लावण्याण्याचाही त्यांचा दांडगा अनुभव होता.
 
 
प्रयाग राज (Director Prayag Raj) यांनी 1963 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. राजेश खन्ना यांचा ‘सच्चा झूठा’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. तो त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला होता. ‘जमानत’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा दोन वर्षे आधी प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांचा कुली नसीब, मर्द, अजुब, असे अनेक चित्रपट त्यांनी लिहिले होते. त्याशिवाय अभिनेते म्हणून त्यांनी ‘कॉन मॅरी’, ‘प्रतीक्षा’, ‘माय लव’, ‘द गुरू’, ‘जब जब फुल खिले’, ‘आवारा’, ‘आग’ अशा सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.
Powered By Sangraha 9.0