बुलडाणा,
Lonar Sarovar Development : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी लोणार येथे भेट दिली. त्यांनी वनकुटी येथे यंत्रणांची आढावा बैठक घेऊन लोणार सरोवर विकास आराखड्यातील विकासकामांची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सरोवर परिसरात वृक्ष लागवड, चेनलिंक फेन्सिंग, पर्यटकांकरीता स्वच्छतागृह, सरोवरातील वेडीबाभूळ काढणे, अतिक्रमणे काढून सरोवराचे जतन करण्याची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देऊन सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
जुन्या सांडपाणी प्रकल्पातील पाणी सरोवरात जाणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा उपसा करणे, लोणार शहराकरीता पाणीपुरवठा योजना, पुरेसे व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, Lonar Sarovar Development नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटार योजना, स्मशानभूमी, भारतीय पुरातत्व विभागाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. लोणार सरोवरापासून समृद्धी महामार्ग जवळ असल्याने पर्यटकांसाठी येथे पोहोचणे सहज झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनक्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. सोबतच जैववैविध्याची काळजी घेऊन सरोवराचे संवर्धन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी Lonar Sarovar Development मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. शेळके, वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी प्रकाश सावळे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विभा वराडे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख उपस्थित होते.