गडचिरोली,
Nari Shakti Vandan गेल्या 60 वर्षापासून महिलांच्या सन्मानार्थ कोणतीच ठोस पाऊले उचलण्यास काँग्रेस सरकारला यश आले नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी आपल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात महिलांच्या हिताच्या विविध योजना अंमलात आणून महिलांना न्याय मिळवूव दिला आहे. जनधन योजना, आयुष्यमान भारत तसेच महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के सूट यासह आता गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर महिलांच्या सन्मानार्थ ‘नारीशक्ती वंदन’ योजना हे विध्येयक पास करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या शुभ पर्वावर देशातील महिलांना एक मोठी भेट दिली असल्याचे खासदार अशोक नेते यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेतून दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी अध्यक्ष किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे, योगीता पिपरे, प्रकाश गेडाम, रेखा डोळस, रवींद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, दिलीप चलाख, अनिल तिडके आदी उपस्थित होते.
पूढे बोलताना खासदार नेते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात तब्बल 60 वर्षात जे करता आले नाही, ते मोदी सरकारने अवघ्या 9 वर्षात करून दाखविले आहे. काँग्रेसच्या काळात जेवढा विकास झाला नाही,Nari Shakti Vandan त्याचा दहा पट विकास भाजपाच्या या वर्षात जनतेला दिसून आला आहे. जनसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना अंमलात आणून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचा लाभही जनता घेत आहे. महिलांच्या या ‘नारीशक्ती वंदन’ विध्येयकाने महिलांना अनेक क्षेत्रात फायदा होणार आहे. या विध्येयकामुळे महिलांना विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळून तब्बल 91 महिलांना विधानसभेत संधी मिळणार आहे. यापूर्वीही महिलांच्या सन्मानार्थ मोदी सरकारने विविध योजना अंमलात आणल्या आहे. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनातून यापूढेही नवनवीन योजना महिलांच्या सन्मानार्थ अंमलात आणल्या जाणार असल्याचेही खासदासर अशोक नेते यांनी यावेळी सांगीतले.