महाराष्ट्राचं राज्यफूल ...ताम्हण !

25 Sep 2023 17:01:40
रानफुले
- ऋतुजा कुकडे
state flower-maharashtra रानफुलांवरती नवीन सदर सुरु करताना डोळ्यासमोर सर्वात आधी आलेलं फुल म्हणजे ताम्हण. आणि येऊही का नये महाराष्ट्राचं राज्यफूल म्हणून मिरवणार हे फुल आहेच मुळी आकर्षक, सुंदर आणि स्मरणात राहील अस. ‘प्राइड ऑफ इंडिया', ‘क्वीन्स फ्लॉवर', अशी विविध इंग्रजी नावं असलेला ताम्हण हा मराठी मोठा बोन्डारा किंवा जारूळ नावानेही ओळखला जातो. state flower-maharashtra साधारण पन्नास फुटांची उंची गाठणारं हे देखणं झाड लांबुळक्या हिरव्याकंच पानांनी समृद्ध असतं. शंभर टक्के भारतीय असलेला ताम्हण हा महाराष्ट्रात बहुतेक सर्व भागांत आढळतं.
 
 
 
state flower-maharashtra
 
 
‘ल्यॅगरस्ट्रोमिया' असं वनस्पतीशास्त्रीय नाव धारण केलेलं, मेंदीच्या लिथ्रेसी कुटुंबातलं हे झाड आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांमधील सर्व प्रकारच्या जंगलात आढळतं. state flower-maharashtra महाराष्ट्रात कोंकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये ताम्हण आढळतो. वसंतात नाजूक कोवळी पान यायला सुरू होतानाच फुलांनाही बहर यायला सुरुवात होते. निष्पर्ण फांद्यांच्या टोकाला साधारण तीस सेंमी लांब फुलाचे घोस यायला सुरुवात होते. या जांभळट गुलाबी फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही खालून वर उमलत जातात. state flower-maharashtra ही पूर्ण उमललेली फुलं पाच-सहा सेंमी व्यासाची असतात. सहा-सात जांभुळसर गुलाबी रंगाच्या झालरीसारख्या पाकळ्या आणि त्यात पिवळे धम्मक, नाजूक पुंकेसर हे ताम्हणाचं सौंदर्य अधिकच खुलवतात. भर उन्हात एप्रिल सरता सरता ताम्हण फुलांनी लगडून जातो ते जून संपेपर्यंत !
 
 
state flower-maharashtra उन्हाळ्याच्या शेवटी फुल गळून पडल्यावर या झाडाला फळं अर्थात बोंड धरायला सुरुवात होते. साधारण दोन सेंमी बोरांसारखी दिसणारी ही फळं, यांच्या डोक्यावरती एक टोकदार काटा असतो. टणक आवरण असलेली हि फळं सुकून काळसर तपकिरी होतात. यात सुकलेल्या अगदी पातळ चपट्या बिया असतात. यांना म्हातारीच्या केसांसारखे पंख असतात जे या बीजांना दूरवर वाहून नेतात. state flower-maharashtra ताम्हण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यासाठी उत्तम वृक्ष तर आहेच सोबतच बहुपयोगी सुद्धा आहे. ताम्हणाचे लाकूड हे सागाला अतिशय योग्य पर्याय आहे कारण ह्याचे लाकूड हे लाल, मजबूत, चमकदार व टिकाऊ असत. state flower-maharashtra ताम्हणाची साल आणि पान ही औषधी असतात जी विविध रोगांमध्ये उपचारासाठी वापरली जातात.
 
 rutujakukade@gmail.com
Powered By Sangraha 9.0