अकोला,
Blood camp : येथील मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळातर्फे मंडळाच्या प्रांगणात रविवार 24 सप्टेंंबर रोजी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. या दोन्ही शिबिरात नागरिक व युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हे शिबिर यशस्वी केले.या शिबिरात 234 नागरिकांनी रक्तदान केले. स्व.निकुंज कोठारी यांच्या स्मृतीत आयोजित या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात आयएमएचे अध्यक्ष डॉ.संदीप चांडक, डॉ. अनुप कोठारी, डॉ. अमरीश खटोड, डॉ.आशिष डहेणकर, प्रकल्प प्रमुख अनिल राठी, पराग शाह, पंकज तापडिया, सुशांत राठी, नंदकिशोर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात 234 नागरिकांनी रक्तदान करून आपले दायित्व पार पाडले. त्यांना प्रशस्तीपत्रे बहाल करण्यात आली. रक्त संकलन हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. समीर देशमुख व त्यांच्या वैद्यकीय चमूने केले.
शिबिर स्थळी नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या Blood camp शिबिरात डॉ.अमित राजपाल, डॉ. तुषार चरखा, डॉ. ललित राठी, डॉ. विद्याधर वनवे, डॉ. प्रीती चरखा, डॉ. मनीषा राठी, डॉ. तिलक चांडक आदींनी विविध उपकरणांद्वारे रुग्ण तपासणी केली. या तपासणी शिबिराचा तब्बल 90 महिला पुरुष नागरिकांनी लाभ घेतला. डॉ. अनुप कोठारी, डॉ. संदीप चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन हिना विजय शहा यांनी तर आभार ब्रजेश तापडिया यांनी मानलेत. शिबिरासाठी मंडळाचे मार्गदर्शक शरद चांडक, अशोक भुतडा, नितीन चांडक, शैलेश तिवारी, भूपेंद्र तिवारी, गोविंद लढ्ढा, सचिन चांडक, प्रमोद मालपाणी, केशव खटोड, सुशांत राठी, आर्कि. अमित राठी, अश्विन जाजू, राम बाणाईत, राधेश्याम चांडक, विजय राठी जावरा, संजय मंत्री, अजय सारडा, पलक तिवारी, संकेत चांडक, प्रशांत चांडक, अलोक भुतडा, विलास मोरे आदींनी सहभाग घेतला.