धोचीच्या जिप प्राथमिक शाळेला गावकर्‍यांनी लावले टाळे

26 Sep 2023 19:46:55
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Dhochi Zp Primary School  : पोहणा केंद्र शाळेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोची येथे शिक्षक नसल्याने गावकर्‍यांनी शाळेला चक्क टाळे लावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाळेला भेट देऊन तात्काळ शिक्षक देण्याची मागणी केली आहे. धोची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकच शिक्षक असून पाच वर्ग आहेत.

Dhochi Zp Primary School  
 
मुख्याध्यापकाचा प्रभार, Dhochi Zp Primary School  माहिती, प्रकल्प, वरिष्ठांना आभासी माहिती पुरविणे, शासनाच्या आदेशानुसार सर्वेक्षण ही सर्व कामे त्या एकाच शिक्षकावर असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणावर दुर्लक्ष झाले आहे. गावकर्‍याची 3 महिण्यापासून शिक्षक देण्याची मागणी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेे. गावकर्‍यांनी प्रशासनावर रोषव्यक्त करीत शाळेला टाळे ठोकले असुन 3 दिवसांच्या आत शाळेत शिक्षक द्यावा अशी मागणी गावकर्‍यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आहे.
 
 
अतुल वांदिले यांच्यासह Dhochi Zp Primary School  जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य ओंकार मानकर, माजी सरपंच प्रकाश बावणे, सरपंच नितू डंभारे, उपसरपंच मोतीराम देवाडे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपाली नरुले, गजानन कौसर, वंदना नैताम, माधुरी नेवाडे, दीपाली डंभारे, निलेश इंगळे, प्रशांत दाते, मनोहर बावणे, श्रावण डंभारे, सुवर्णा डंभारे, विरेंद्र बावणे, सुनील साठे, नरेश भोयर, अतुल कोल्हे आदी गावकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0