पंतप्रधान घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी

26 Sep 2023 16:03:22
कारंजा लाड, 
Pradhan Mantri Gharkul Yojana शहरी व ग्रामीण भागातील गोरगरिबांची राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान घरकुल आवास योजना राबविल्या जाते या संदर्भात २८ जुलैला शासनाने ओबीसीच्या ग्रामीण भागातील घरकुलाबाबत एक निर्णय घेतला त्या निर्णयाची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे वाशीम जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र मेश्राम यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 

पंतप्रधान घरकुल योजनेची 
 
तसेच जिल्यातील तालुका निहाय उद्दीष्टे देण्याचे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना त्वरित व तात्काळ आदेशीत करावे. अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत शहरी घरकुलला २ लाख ५० हजार चा निधी दिला जातो तर पंतप्रधान आवास योजने अंतर्गतच्याच ग्रामीण घरकुलाला मात्र १ लाख २० हजार रुपयाचा निधी दिला जातो. या दोन्ही योजना पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत राबविल्या जाते तर ग्रामीण व शहरी विभागाला या योजनेअंतर्गत निधीचा भेदभाव का केल्या जाते.Pradhan Mantri Gharkul Yojana असा सवाल सुद्धा मेश्राम यांनी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला विचारला आहे. या योजनेअंतर्गत चा निधी संदर्भातील भेदभाव दूर करून शहरी विभाग प्रमाणे ग्रामीण विभागाच्या घरकुल बांधणीला देखील २लाख ५० हजार चा निधी देण्यात यावा अशी मागणी सुद्धा मेश्राम यांनी या निवेदनातून केली आहे.
Powered By Sangraha 9.0